आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाची प्रिंटींग मिस्‍टेक, 1 लाखांऐवजी 1 रुपयाच्‍या मदतीचा उल्‍लेख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना दिल्‍या जाणा-या मदतीबाबतचे लेखी उत्‍तर आज साजर करण्‍यात आले. उत्‍तराच्‍या प्रतमध्‍ये आत्‍महत्‍याग्रस्‍त कुटुंबांना 1 लाख रूपयांऐवजी 1 रूपया मदतीचा उल्‍लेख करण्‍यात आला. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी पहिल्या प्रश्नोत्तरातच या छापिल उत्तरातील चूक लक्षात आणून दिली नि विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. मात्र, ही प्रिंटींग मिस्‍टेक असल्‍याचे सांगत प्रकरणाची चौकशी केली जाईल असे आश्‍वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले.
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..