आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: कैदी पलायन;पोलिसाला अटक, पोलिस आयुक्तालयाच्या इतिहासातील पहिली घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दोन दिवसांपुर्वी इर्विनच्या आरोपी कक्षातून जन्मठेपेच्या एका कैद्याने पहाऱ्यावरील पोलिसाच्या खिशातून चाबी काढून पळ काढला होता. दरम्यान हा कैदी सात तासानंतर पकडल्या गेला. मात्र पहाऱ्यावर कर्तव्य बजावत असताना हलगर्जीपणा केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आल्यामुळे पहाऱ्यावर असलेल्या पोलिसाविरुध्द गुन्हा दाखल झाला असून त्या पोलिसाला शुक्रवारी उशिरा रात्री कोतवाली पोलिसांनी अटकसुध्दा केली होती. 

आरोपीच्या पलायनाप्रकरणी पहाऱ्यावरील पोलिसाविरुध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची पोलिस आयुक्तालयाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. या पोलिसाला शनिवारी निलंबीतही करण्यात आले आहे. पोलिसावरील कारवाईने संपुर्ण शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस शिपाई प्रफुल्ल तंतरपाळे (ब. नं. १६७०) असे गुन्हा दाखल करून अटक केलेल्या पोलिसाचे नाव आहे.

प्रफुल्ल तंतरपाळे यांना शनिवारी जामिन मिळाला आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहात खुनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला शब्बीर खान जागीर खान (४८, रा. मुंबई) याला उपचारासाठी इर्विनमध्ये दाखल केले होते. वॉर्ड क्रमांक १६ जवळ असलेल्या आरोपी कक्षात असताना शब्बीर खानने १६ फेब्रुवारीला दुपारी पोलिसांच्या कस्टडीतून पळ काढला होता. यावेळी आरोपी कक्षात चार पेालिसांची गार्ड ड्युटी होती. त्यापैकी प्रफुल तंतरपाळे यांची पहाऱ्यावर ड्युटी असतानाच शब्बीर खान पसार झाला होता. 

तंतरपाळे पहाऱ्यावर असताना त्यांनी कर्तव्यात निष्काळजीपणा केला त्यामुळेच त्यांच्या खिशात असलेली कुलपाची चाबी काढून प्रफुल्ल तंतरपाळे यांची नजर चूकवून तो कुलूप उघडून पसार झाला असल्याचे चौकशीत पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर सात तासानंतर पोलिसांनीच त्याला रेल्वे स्थानकावरून पकडले होते. मात्र या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी कोतवालीचे ठाणेदार विजय पाटकर यांना दिले होते. त्याची प्राथमिक चौकशी पुर्ण होवून त्यांनी शनिवारी सांयकाळीच चौकशी अहवाल एसीपी मिलींद पाटील पोलिस आयुक्तांकडे सादर केला.

प्राथमिक चौकशीमध्ये प्रफुल तंतरपाळे यांनी कर्तव्यावर असताना हयगय केली त्यामुळे आरोपीला पळून जाण्यास मदत झाली, या आशयाचा ठपका ठेवून कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला. हा गुन्हा शनिवारी रात्री कोतवाली पोलिसात दाखल झाला, गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांनी तंतरपाळे यांना अटक केली होती. शनिवारी त्यांना जामिन मिळाला. दरम्यान तंतरपाळे यांना सायंकाळीच आयुक्तांनी निलंबित केल्याचे कोतवालीचे ठाणेदार विजय पाटकर यांनी सांिगतले. 
बातम्या आणखी आहेत...