आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी वाहनचालकांची दिवाळी; प्रवासी संतप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे - ऐनदिवाळीमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा शहरासह ग्रामीण भागातील जनजीवनावरही मोठा परिणाम होत आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने दोन दिवसांसाठी येणाऱ्या माहेरवाशीणींना या संपामुळे मुकावे लागणार की काय, असा प्रश्न पडला आहे तर अनेकांनी दिवाळीच्या सुटीमध्ये बाहेरगावी जाण्याचे नियोजन रद्द केले आहे. संपाबाबत तालुक्यातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
 
सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एसटी चालक-वाहकांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. संपाचा फटका प्रवाशांना तर बसतोच आहे, परंतु सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाता येत नसल्यामुळे लहान मुलेही हिरमुसली आहेत. जनसामान्यांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही जनसामान्यांना पडला आहे. संपामुळे बाहेरगावी जाणे शक्य नसल्याने ज्यांनी एसटीचे आरक्षण केले होते, त्यांनी पैसे परत मिळावेत म्हणून महामंडळाच्या कार्यालयात धाव घेतली असली, तरी संप कधी मिटणार याबाबत शाश्वती नसल्याने अनेकांनी बाहेरगावी जाण्याचा बेतच रद्द केला आहे. 
 
दरवाढ करून प्रवाशांना धरले वेठीस 
संपामुळे प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेतला. त्यांनी संधीचे सोने करत दरवाढ करून प्रवाशांना वेठीस धरले. त्यांनी प्रवाशांची कोंडी करून आपली दिवाळी साजरी करून देण्यावर भर दिलेला दिसून येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...