आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रा. साईबाबा म्हणाले- कन्हैयाचा अभिमान वाटतो, लवकरच खालिद, अनिर्बनला भेटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेल्या कन्हैयाकुमार, ओमर खालिद, अनिर्बन भट्टाचार्य यांचा आपल्याला अभिमान असून लवकरच अापण त्यांची भेट घेणार अाहाेत...’ नक्षलींशी संबंधाचा अाराेप असलेले प्रा. जी. एन. साईबाबा याने गुरुवारी पत्रकारांशी बाेलताना असे मत व्यक्त केले. सर्वाेच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर प्रा. साईबाबा याची नागपूर कारागृहातून सुटका करण्यात अाली.

प्रा. साईबाबा म्हणाला, ‘तुरुंगातून सुटल्यानंतर आरोग्याकडे लक्ष देण्याची आपली प्राथमिकता असली तरीही आपण सर्व विद्यार्थी नेत्यांना भेटणार अाहाेत.’ नक्षलवाद्यांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्याने फारसे बाेलणे टाळले. मी नक्षलवादी नाही किंवा नक्षलवाद्यांचा रिक्रूटरदेखील नाही’, असा पुनरुच्चारही केला.

कैद्यांचा अतोनात छळ
नागपूर कारागृह हे एक प्रकारे ग्वांटानामो बे कारागृहच असून (अमेरिकेतील कारागृह) येथे कैद्यांचा अतोनात छळ केला जातो. अपंग असल्याने आपला कारागृहात शारीरिक छळ झाला नसला तरी आपल्याला वेळेवर औषधी मिळत नसल्याने प्रकृती बिघडल्याचा दावा साईबाबाने केला. मात्र, इतर कैद्यांचा छळ पाहिल्यावर आपल्याला धडकी भरत होती, असेही तो म्हणाला.