आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैद्यकीय सेवेचे आयएमएस केडर स्थापण्याचा प्रस्ताव; केंद्राकडून लवकरच निर्णय अपेक्षित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- देशात सार्वजनिक आरोग्य सेवांत सुधारणा व मनुष्यबळाच्या कमतरतेची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने भारतीय प्रशासकीय सेवेच्या धर्तीवर (आयएएस) वैद्यकीय सेवेसाठी आता भारतीय वैद्यकीय सेवा (आयएमएस) हे स्वतंत्र केडर तयार करण्याची शिफारस करणारा अहवाल इंडियन मेडिकल कौन्सिलने मंजूर केला आहे. यामुळे आता केंद्राकडून धोरणात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 


कौन्सिलच्या अभ्यासगटाने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात समस्यांचे समाधान करण्यासाठी भारतीय वैद्यकीय सेवा हे स्वतंत्र केडर निर्माण करण्याची शिफारस केली. अभ्यासगटाचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, ब्रिटिश राजवटीत १९४७ पर्यंत आयएमएस केडर अस्तित्वात होते. मात्र, नंतर काही कारणाने ते कायम ठेवले नाही. 


या केडरमुळे सार्वजनिक क्षेत्रातील मनुष्यबळाची कमतरता, सेवा सुधारण्यासह वैद्यकीय सेवेचे नेतृत्व करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ उपलब्ध होऊ शकतील.

बातम्या आणखी आहेत...