आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन बियाणे कंपन्यांच्या मान्यता रद्दचा प्रस्ताव; कृषी विकास अधिकाऱ्यांकडे 35 तक्रारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- जिल्ह्यात बोंडअळीमुळे कपाशीचे पीक धोक्यात आल्याने बहुतांश कपाशी बियाणे उत्पादक कंपन्यांची तपासणी सुरू असून अजित कावेरी या नामांकित बियाणे उत्पादक कंपन्यांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा कृषी विकास अधिकारी कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. 


बीटी कपाशी वाणावर सध्या बोंडअळ्यांचे थैमान असून, मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजात ३० टक्के कपाशीचे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या कपाशीची पाहणी सुरू आहे. दरम्यान, बोंडअळ्या असल्याच्या जिल्ह्यातून बहुतांश बीटी कंपन्यांच्या विरुद्ध कृषी विभागाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. अजित कावेरी या दोन प्रमुख बियाणे उत्पादक कंपन्यांच्या विरुद्ध विविध स्वरूपाच्या सर्वाधिक ३० ते ३५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. गुण नियंत्रण पथकाच्या वतीने संबंधित तपासण्यात करण्यात आल्यानंतर अजित कावेरी कंपनीचे बियाणे सदोष आढळले. 


त्रुटी आढळल्या 
अजित कावेरी कंपनीबाबत सर्वाधिक तक्रारी असून, क्षेत्रीय पाहणी केल्यानंतर अनेक त्रुट्या आढळल्या. त्यामुळे या कंपन्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तांकडे पाठवला.
- उदय काथोडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी. 

बातम्या आणखी आहेत...