आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चक्काजाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कधी अवकाळी पावसाने तर कधी कोरड्या दुष्काळाने मोठे नुकसान केले. निसर्ग शेतकऱ्यावर कोपला आहे. त्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागत आहे. आणखी किती शेतकऱ्यांचे बळी गेल्यावर कर्जमाफी होणार असा आरोप करीत शिवसेननेच्यावतीने शनिवारी (दि. ११) नागपूर- औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर देवगाव येथील चौफुलीवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 
 
महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर अस्मानी जुलमी संकट उभे असतांना शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी त्यांच्यावर असणारा कर्जाचा बोजा कमी करावा तसेच सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीतआहे, असा आरोप याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख नीलेश तिवारी यांनी केला. 
 
कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असून ,शेतकऱ्यांची थट्टा चालवित असल्याचे चित्र समोर उभे असल्याचे माजी उपजिल्हा प्रमुख मनोज कडु यांनी सांगितले शिवनेने चक्का जाम आदोलन केल्याने नागपूर- औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती जड वाहनांच्या रांगाच्या रांगा रत्यावर उभ्या झाल्या होत्या. या आंदोलनात धामणगाव शहरप्रमुख गोपाल मोकलकर , आशा ठाकरे, नीलेश मुंदाणे, दिनेश साबळे, दीपक कुमरे,गजानन मोरे, किसान ठाकरे,प्रमोद ढोमाने आदि सहभागी झाले होते ,असे शिवसेनेचे तालुका प्रमुख नीलेश तिवारी यांनी सांगितले. दरम्यान धामणगावचे तहसीलदार चंद्रकांत कोहरे यांनी भेट देऊन निवेदन स्विकारले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दत्तापूरचे ठाणेदार अशोक लांडे, तळेगाव दशासरचे ठाणेदार नीलेश सूरडकर यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता. या आंदोलनामुळे अनेक वाहनचालकांची प्रवाशांची गैरसोय झाली. 
बातम्या आणखी आहेत...