आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रद्द नोटांची १५ लाखांची लाच घेणाऱ्या उपनिरीक्षकावर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - चोरीच्या गुन्ह्यात कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षकाने ५०० आणि १ हजारच्या जुन्या नोटांच्या स्वरूपात १५ लाखांची लाच मागितल्याचा प्रकार नागपुरात उजेडात आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपनिरीक्षकासह वकील आणि अॅटर्नी अशा तिघांवर लाचेचे गुन्हे नोंदवले आहेत. या तिघांपैकी वकील आणि अॅटर्नीला अटक करण्यात आली असून उपनिरीक्षक फरार आहे.
काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यावर त्या बदलण्यासाठी सर्वसामान्यांची दमछाक होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील लकडगंज पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक उमाकांत राठोड यांनी एका चोरीच्या गुन्ह्यात कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पाचशे व एक हजारच्या जुन्या नोटांच्या स्वरूपात १५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार एसीबीच्या कारवाईत उघडकीस आला. या उपनिरीक्षकाने लाच घेण्याची जबाबदारी हर्षल दिवाकर राठोड या वकिलाकडे सोपवली होती. लाच द्यावयाची नसल्याने संबंधित व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिल्यावर एसीबीने सापळा रचला होता. अॅड. हर्षल राठोड याच्या सूचनेवरून गणेश जयस्वाल या अटर्नी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने रक्कम स्वीकारल्यावर एसीबीने दोघांनाही रंगेहाथ पकडून अटक केली, तर या कारवाईची माहिती मिळाल्यावर उपनिरीक्षक राठोड फरार झाले. यासंदर्भात एसीबीने उपनिरीक्षक राठोड, वकील हर्षल राठोड आणि अटर्नी जयस्वाल अशा तिघांवर लाचलुचपतीचे गुन्हे नोंदवले आहेत.
बातम्या आणखी आहेत...