आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएसआय शेख यांची क्राईम ब्रँचमधून बदली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावाणीमध्ये हयगय केल्याचा ठपका ठेवत चौकशी करण्याचे आदेश दिलेले गुन्हे शाखेचे पीएसआय अयूब शेख यांची तडकाफडकी गुन्हे शाखेतून गाडगेनगर ठाण्यात बदली केली आहे. शहरात गोवंश वाहतूक बंद करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी मध्यतंरी विशेष पथक सुरू केले होते. मात्र कालांतराने ते पथक बंद झाले. ही संधी साधून शहराच्या बाहेरील मार्गावरून गोवंश वाहतूक सुरू झाल्याची माहिती पोलिस आयुक्तांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेला गोवंश वाहतूक करणाऱ्याविरुध्द कारवाईचे आदेश दिले. हे आदेश होताच मागील महिनाभरापासून गोवंश वाहतूकीची थांबलेली कारवाई अचानकपणे झाली. ती कारवाई पीएसआय अयूब शेख यांनी केली होती. दरम्यान मागील महिनाभरात कारवाई झाल्यामुळे पोलिस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. सदर चौकशीचा अहवाल पोलिस आयुक्तांना प्राप्त होताच पीएसआय अयूब शेख यांची तडकाफडकी गुन्हे शाखेतून गाडगेनगर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. 
 
अहवालावरून बदली 
^आम्ही गोवंश वाहतूक प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी अहवाल प्राप्त होताच आम्ही पीएसआय अयूब शेख यांची गुन्हे शाखेतून गाडगेनगर पोलिस ठाण्यात बदली केली आहे. ही बदली चौकशी अहवालाच्या आधारेच करण्यात आलेली आहे. दत्तात्रयमंडलीक,पोलिस आयुक्त. 
 
बातम्या आणखी आहेत...