आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुश हत्या प्रकरणातील आयुष पुगलियाचा नागपूर कारागृहात खून; पूर्ववैमनस्यातून घडली घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- २०११ मध्ये उपराजधानी नागपुरात गाजलेल्या कुश कटारिया अपहरण व हत्या प्रकरणात दोषी ठरलेला व तिहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आयुष पुगलिया या कैद्याचा नागपूर मध्यवर्ती कारागृहात डोक्यात फरशी मारून खून करण्यात आला. या घटनेने कारागृह यंत्रणेत खळबळ उडाली असून कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.   
 
सोमवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास आयुष पुगलिया हा त्याच्या सेलच्या बाजूला असलेल्या शौचालयात गेला होता. त्याच्या पाळतीवर असलेल्या सूरज कोटनाके या कैद्याने त्याच्या मागे जाऊन शौचालयातच त्याच्या डोक्यावर फरशीचे घाव केले. त्यानंतर त्याने जेवणाची थाळी वाकवून तयार केलेल्या धारदार वस्तूने गळा चिरून त्याचा खून केला. कारागृहातील पहारेकऱ्यांनी सूरजला लगेच ताब्यात घेऊन रक्तबंबाळ झालेल्या आयुष पुगलियाला कारागृहाच्या रुग्णालयात दाखल केले.  मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. आयुष हा घटनास्थळीच ठार झाल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे. धंतोली पोलिसांना या घटनेची माहिती दिली असून पोलिसांनी मारेकरी सूरज याला अटक केली. दोन दिवसांपूर्वी आयुष व सूरज यांच्यात भांडण झाले होते. त्याचाच सूड सूरजने उगवल्याचे सांगितले जात आहे. मारेकरी हादेखील जन्मठेपेचा कैदी असून तो मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.  या घटनेची कारागृह प्रशासनाच्या वतीनेदेखील चौकशी होणार असल्याचाीा माहिती पोलिसांनी दिली.


मृत पुगलियाला गांधी विचारधारा पुरस्कार   
कारागृहात ठार झालेल्या आयुष पुगलिया याने कारागृहात स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आयोजित गांधी विचारधारा परीक्षेत उत्तम कामगिरी बजावली होती. त्यामुळे त्याला पुरस्कृत करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...