आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना समन्‍स; मराठा क्रांती मोर्चा वादग्रस्‍त व्‍यंगचित्र प्रकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- मराठा क्रांतीमोर्चावर वादग्रस्‍त व्‍यंगचित्र काढल्‍याप्रकरणी पुसद न्‍यायालयाने 'सामना'चे संपादक संजय राऊत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍यासह व्‍यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्‍याविरुद्ध समन्‍स बजावले आहे. 19 डिसेंबररोजी न्‍यायालयात हजर राहण्‍याचे आदेश चौघांना कोर्टाने दिले आहे.


काय आहे प्रकरण?
कोपर्डी येथे अल्‍पवयीन शाळकरी मुलीवर बलात्‍कार करुन निर्घृणपणे तिचा खून करण्‍यात आल्‍यानंतर संतप्‍त मराठा समाजाच्‍या वतीने राज्‍यभरात मुक मोर्चे काढण्‍यात आले होते. या मोर्चांना राज्‍यभरात प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. मात्र याचदरम्‍यान शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनामध्‍ये या मोर्चाची टिंगल करणारे व्‍यंगचित्र छापून आले होते. याविरोधात मराठा समाजात संतप्‍त प्रतिक्रीया उमठल्‍या होत्‍या. यवतमाळमध्‍ये या व्‍यंगचित्राविरोधत अॅड. दत्‍ता सुर्यवंशी यांनी 26 सप्‍टेंबर, 2016 रोजी पुसद न्‍यालयात तक्रार दाखल केली होती. व्‍यंगचित्रामुळे मराठा समाजाच्‍या भावना दुखावल्‍या असून दोषींवर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी त्‍यांनी केली आहे. याच प्रकरणी सुनावणी करताना न्‍यायालयाने चौघांना 19 डिसेंबरला न्‍यायालयात हजर राहण्‍याचे आदेश दिले आहेत.       

बातम्या आणखी आहेत...