आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठल्या तोंडाने शेतकरी मोर्चे काढणार? रघुनाथदादा पाटील यांचा सवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विधिमंडळअधिवेशनाच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने काढण्यात येणारे मोर्चे म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली चली हज को असा प्रकार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची धोरणेही शेतकरी विरोधी होती. मग कुठल्या तोंडाने हे लोक शेतकऱ््यांसाठी मोर्चे काढत आहेत, असा सवाल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि शेतकऱ््यांच्या संघटनांच्या सुकाणू समितीचे मुख्य मार्गदर्शक रघुनाथदादा पाटील यांनी गुरुवारी नागपुरात बोलताना उपस्थित केला. 


रघुनाथदादा पाटील म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आता शेतमालासाठी दर मागत आहेत. स्वामीनाथन आयोगाची नेमणूक आघाडीच्या काळातच झाली होती. अहवाल देखील यांच्या काळातच आला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वामीनाथन अहवालावर आठ वर्ष कार्यवाही केली नाही. या पक्षांच्या नेत्यांचे साखर कारखाने आजही शेतकऱ््यांच्या उसाला दर देत नाहीत. याची या पक्षांना लाज कशी वाटत नाही. आता हेच लोक शेतकऱ्यांसाठी मोर्चे काढायला निघाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीच धोरणे आताचे सरकार पुढे राबवत असल्याचे सांगून रघुनाथदादा म्हणाले की, कर्जमाफीचा पार बोजवारा उडाला आहे. 


मोठाले दावे करणाऱ््या फडणवीस सरकारने चक्क फसवणूक केली असून कुणालाही कर्जमाफीचा लाभ झाला नसल्याची वस्तुस्थिती आहे. कारण सरकारने बँकांना पैसेच दिलेले नाहीत. सरकार मात्र आकडेवारी पुढे करतेय. मटक्याची आकडेवारी देखील यांच्या कर्जमाफीच्या आकडेवारीपेक्षा विश्वसनीय वाटावी, असे ते म्हणाले. डाळींवरील आयातबंदी कायमस्वरुपी उठविली गेली नाही. त्यामुळे दर वाढलेले नाही. सोयाबीन, कापूस या पिकांना दर मिळत नाही. खरेदीसाठीही सरकार टाळाटाळ करते आहे. विदर्भाच्या मंत्र्यांनी खरे तर राजीनामे दिले पाहिजे, असे रघुनाथदादा म्हणाले. बोंडअळी मुळे पीक नष्ट झाले आहे. कापूस उत्पादकांना बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. 


१० डिसेंबरपासून पुण्यात हाेणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिषदेत देशभरात शेतकऱ्यांची आघाडी तयार करण्याबाबत निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सत्यशोधक किसान चळवळीचे किशोर ढमाले, बळीराजा संघटनेचे गणेशकाका जपताप, अमरावतीचे धनंजय काकडे पाटील, राजेंद्र सोनोने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...