आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात पावसाचे १३ बळी, दुबार पेरणीचे संकट गहिरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातजून ते १२ जुलै या कालावधीत वादळी पाऊस गेल्या काही िदवसांतील संततधारेमुळे २८ गावांतील ४३५ कुटुंब प्रभावित झाले आहेत. वीज कोसळून आजवर जणांचा मृत्यू झाला, दोन जण पुरात वाहून गेले तर एकाचा घर कोसळून मृत्यू झाला. एका युवकाचा वादळी वाऱ्यामुळे टीनाचे पत्रे उडून घरी वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. बगाजीसागर धरणात सोमवारी एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये एकूण सहा जण जखमी झाले. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतात पाणी तुंबल्याने तुरीच्या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. पुरामुळे नदी नाल्याकाठची जमीन मोठ्या प्रमाणात खरडून गेली. मंगळवारी दुपारी पाऊस थांबल्याने पूर परिस्थिती ओसरली असून यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून संततधार सुरू आहे. तब्बल महिनाभर उशिरा आलेल्या पावसामुळे पेरण्यांना विलंब झाला. दरम्यान पेरण्या झाल्यानंतर लगेच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे अंकुरणारी बियाण्यांचे कोंब कुजून गेले. तसेच सर्वच तालुक्यांमधील पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अमरावती तालुक्यात ११३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २३६ घरांची पूर्णत: पडझड झाली तर १०७ घरांचे अंशत: नुकसान झाले. याहीपेक्षा जास्त अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या आहे. एकूण ५२२ घरांचे वादळी पावसामुळे नुकसान झाले. तसेच ११२ झोपड्या पूर्णत: नष्ट झाल्या. सोबतच जनावरांचे १० गोठेही वाहून गेल्याने तेथील जनावरे उघड्यावर पडली. त्यांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. त्याचप्रमाणे दोन सार्वजनिक आणि १० खासगी मालमत्तांचेही एकूण ४२ लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाकडून एकूण २८ लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. अद्याप काहींनी सानुग्रह अनुदान दिले नसून काहींचे अनुदान प्रलंबित आहे.
वादळीपावसामुळे मृत व्यक्तींची नावे : वादळीपाऊस,वीज पडून,पुरात वाहून गेल्याने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये नंदकिशोर केशव काष्टे( रा. वरुड बगाडी), आकाश रामेश्वर खडेकर (रा.जुनी वस्ती बडनेरा), सुलोचना गुलाबराव सारेवर( रा. शेंदोळा खु. ता. तिवसा), श्रीराम वामनराव जाधव (रा. निंबोली ता. धामणगांव), मारोतराव राजाराम घोगरे (रा. नांदुरा बु. ता. अमरावती), श्रीकृष्ण लक्ष्मण धुर्वे (रा. मोझरी ता. तिवसा), गणेश झोलबाजी चांदेकर (रा. मोझरी ता. तिवसा), ज्ञानदेव गणपत कंठाळे (रा. राजुरवाडी ता.मोर्शी), रवींद्र विश्वनाथ तायडे (रा. नया अकोला ता. अमरावती), अंबादास जयराम यवतकर (रा. फत्तेपूर (शिवणगांव,ता. तिवसा), वनिता शालीकराम कास्देकर (रा. बारू, ता. धारणी), निखिल मनोहर पंचबुद्धे (रा. भातकुली), चिनाबाई देवसाव कुमरे (रा. चिचोळी गवळी ता. मोर्शी) या १३ जणांचा समावेश आहे.
मुसळधारपावसाने घेतला २२ जनावरांचा जीव : जिल्ह्यातपावसाने मोठ्या लहान दुधाळ जनावरांसह ओढकाम करणाऱ्या मोठया लहान अशा एकूण २२ जनावरांचा जीव घेतला आहे. पाच मोठी दुधाळ जनावरे, सहा लहान दुधाळ जनावरे, नऊ ओढकाम करणारी मोठी जनावरे आणि लहान ओढकाम करणारी दोन जनावरे पावसामुळे मृत्यूमुखी पडली. यापैकी केवळ लहान दुधाळ जनावरांच्या मालकांनाच शासनातर्फे १६ हजारांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
‘पेढी’चासुमारे ९०० नागरिकांना फटका : अमरावती।अमरावती भातकुली तालुक्यातील अनेक गावांना पेढी नदीच्या पुराचा तडाखा बसला आहे. या पुरामुळे रविवारी वलगाव, नया अकोला, खानापूर, दोणद, थुगाव, कामनापूर, साऊर यासह अनेक गावांमध्ये पाणी शिरले होते. या गावातील गावकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसान झालेल्या नागरिकांना सानुग्रह अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत यंत्रणेला जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सूचना दिल्या. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक गावांमध्ये जाऊन पाहणी केली.

एक्स्प्रेस हायवेसाठी जमीन, जिल्ह्यातील रस्त्याची लांबी
एकूण जमीन लागणार : १० हजार हेक्टर
अमरावती जिल्ह्यातील जमीन : ८०४ हेक्टर
जिल्ह्यातून जाणाऱ्या रस्त्याची लांबी : ७० कि.मी.
रस्त्याचे स्वरूप : सहा लेन
जमिनीसाठी करावा लागणार : १६६१ शेतकऱ्यांशी करार

सर्वेअंती सानुग्रह अनुदान
^सोमवारीसकाळपासूनसर्व गावांमध्ये नुकसानीचे सर्वे सुरू करण्यात आले .मंगळवारी सायंकाळपर्यंत जवळपास सर्व ठिकाणचे सर्वेचे काम आटोपले असून नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पडणार. सुरेशबगळे, तहसीदार, अमरावती.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील निमखेडा-खिराडा-अंजनगाव सुर्जी मार्गावरील नाल्याला मंगळवारी पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दुपारनंतर पुराचे पाणी ओसरले.
बातम्या आणखी आहेत...