आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात वीज पडून एक शेतकरी ठार, आठ जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद/ वणी/मेहकर - विदर्भात मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. शुक्रवारी झालेल्या तीन घटनांमध्ये वीज पडून एक ठार, तर आठ जण जखमी झाले. मृतामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेतकऱ्याचा समावेश अाहे.

पुसद तालुक्यातील गौळ-बाळवाडी शेतशिवारात शुक्रवारी सायंकाळी वीज कोसळली. यात शेतकरी मारोतराव चव्हाण घटनास्थळी मृत झाले, तर त्यांची पत्नी शांताबाई चव्हाण या जखमी झाल्या. वणी तालुक्यातील वरझडी येथे चिंचेच्या झाडावर शुक्रवारी वीज पडल्याने सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास हे ग्रामस्थ झाडाखाली बसले होते. तितक्यात त्या झाडावर वीज कोसळली. मेहकर तालुक्यातील वाल्हूर शिवारातील एका शेतातील झाडावर वीज काेसळून दोघेही गंभीर झाले. लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द या गावातही वीज काेसळून दाेघे जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु अाहेत. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी बुलडाणा जिल्ह्यासह अनेक भागात मध्यम व दमदार पावसाच्या सरी काेसळल्या.
बातम्या आणखी आहेत...