आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण मर्यादा ७५ टक्के करा : राज्यमंत्री रामदास आठवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - देशभरात विविध समाजांकडून होत असलेली आरक्षणाची मागणी लक्षात घेता आरक्षणाची मर्यादा वाढवून आता ७५ टक्क्यांपर्यंत नेण्याची गरज असून आपण तसा प्रस्ताव केंद्र सरकारला देणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नागपुरात बोलताना दिली.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. राज्य सरकार त्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगून आठवले म्हणाले, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंतच असल्याने त्यानंतर दिलेले आरक्षण न्यायालयात टिकत नाही.

केंद्रात विदर्भ राज्याचा प्रस्ताव आणणार
केंद्रातविदर्भ राज्याच्या निर्मितीचा प्रस्ताव आणण्यासाठी आपण: प्रयत्न करणार असल्याची घोषणा आठवलेंनी या वेळी केली. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला रिपाइंचा पाठिंबा आहे. केंद्र ही मागणी पूर्ण करेल, अशी अपेक्षा व्यक्त करताना आपण तसा प्रस्ताव आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...