आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'ॲट्राॅसिटीत दुरुस्तीची वेळ अाली तर राजीनामा देईन, पण ॲट्राॅसिटीत दुरुस्ती हाेऊ देणार नाही'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘ॲट्राॅसिटीकायद्यात दुरुस्ती करण्याची वेळ आणली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, पण ॲट्राॅसिटीत दुरुस्ती हाेऊ देणार नाही,’ असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दिला. नागपुरातील दीक्षाभूमीवर अायाेजित साठाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अायाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
राज्यात सध्या मराठा समाजाचे माेर्चे निघत अाहेत. त्यात अॅट्राॅसिटी कायद्यात दुरुस्तीची मागणी केली जात अाहे. त्याचा संदर्भ देऊन अाठवले म्हणाले, ‘ज्याला अारक्षण द्यायचे त्यांना ते द्यावे, पण आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. संविधानात संशोधन करून इतरांना आरक्षण देण्यास विराेध नाही. मराठा अारक्षणालाही अामचा पाठिंबा अाहे,’ असेही ते म्हणाले. तसेच अमरावती येथे नियाेजित रा. सू. गवई यांच्या स्मारकासाठी २५ काेटी देण्याची घाेषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.अाठवलेंच्या भाषणाचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले, ‘मराठा समाजाचे निघणारे माेर्चे हे दलित समाजाच्या विराेधात नाहीत. त्यामुळे अॅट्राॅसिटी कायदा रद्द करण्याचा सरकारचा काेणताही विचार नाही.’ नितीन गडकरी यांनी बुद्धाचा संदेश आंबेडकरांचे चिंतन जगभर जावे, असे अावाहन केले. नागपुरातील दीक्षाभूमीच्या उभारणीत दादासाहेब गवई यांचे योगदान मोठे असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...