आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेव बाबा पतंजलिचा पाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्तानात प्रचार-प्रसार करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- योगगुरु रामदेव बाबांचे याचे पतंजलि स्वदेशी जिन्सची निर्मिती करणार असल्याचे वृत्त नुकतेच आले. त्यानंतर आता बाबांनी पतंजलिचा प्रचार-प्रसार नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेत करण्याचे संकेत दिले आहेत. या देशांमधील नेत्यांनी अनुकूलता दर्शवली तर स्टोअर उघडण्याची आमची तयारी आहे, असे रामदेव बाबांनी सांगितले आहे.
या मुस्लिम देशात पतंजलिच्या प्रोडक्टची विक्री
पतंजलिचे उत्पादन कॅनडापर्यंत पोहोचले आहेत. आम्ही विदेशातही आमचे प्रोडक्ट विकत आहोत. अजरबैजान एक मुस्लिम देश आहे. तेथील 90 टक्के लोक इस्लामी आहेत. तेथेही आमचे प्रोडक्ट विकले जात आहेत. एका उद्योगपतीने आमच्या प्रॉडक्टमध्ये रुची दाखवली आहे. रिफाईंड खाद्यतेल निर्मितीसाठी आमच्यासोबत हे उद्योगपती करार करणार आहेत. पाकिस्तानमधील नेत्यांनी हिरवी झंडी दिली तर आम्ही तेथेही आमचे स्टोअर सुरु करु.
असा करणार आहेत पतंजलिचा विस्तार
मध्य प्रदेश, आसाम, जम्मू आणि काश्मिर, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये मोठे कारखाने सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या शिवाय इतरही राज्यांसोबत चर्चा सुरु आहे. पतंजलिचे टर्नओव्हर 50 लाख कोटी करण्याचे आमचे लक्ष्य आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादन तयार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. संशोधनावरही भर दिला जात आहे. सध्या 200 वैज्ञानिक वेगवेगळे उत्पादन तयार करण्यासाठी पतंजलिला मदत करत आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा.... रामदेव बाबा असे करतात योगसाधना...
बातम्या आणखी आहेत...