आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात माजी रणजीपटू अमोल जिचकारची गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- माजी रणजीपटू अमोल जिचकारने (38)आत्महत्या केल्याची घटना आज (मंगळवारी) घडली. आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज असून त्याने नुकताच मित्रासोबत रेस्तरॉ सुरु केले होते.

नागपूरमध्ये जन्मलेला  वर्षीय अमोल जिचकार रणजी स्पर्धेत विदर्भाकडून खेळला होता. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहा सामन्यांमध्ये 3.64 इकॉनॉमी रेटने 7 विकेट घेतल्या होत्या. 1998 ते 2002 या चार वर्षात तो क्रिकेटमध्ये सक्रीय होता. तसेच अंडर 19 संघामध्येही तो खेळला होता. अमोल सध्या नागपूरमधील सिव्हील लाईन्स परिसरात राहत होता.

मित्रासोबत पार्टनरशिपमध्ये सुरु केले होते रेस्तरॉ...
काही दिवसांपूर्वीच त्याने मित्रासोबत पार्टनरशिपमध्ये नागपूरमध्ये रेस्तरॉ सुरु केले होते. विपूल पांडे या मित्रासोबत त्याने हा व्यवसाय सुरु केला होता. विपूल पांडे हादेखील माजी क्रिकेटपटू आहे. लॉ कॉलेज चौकात या दोघांनी रेस्टॉरंट होते. अमोल जिचकारचे आईवडील सध्या पुण्यात आहे. अमोलला एका मुलगादेखील आहे. या घटनेने जिचकार कुटुंबीयांना धक्का बसला असून त्यांनी याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला आहे. अंबाझारी येथील स्मशानभूमीत संध्याकाळी अमोलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...