आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षीय मुलीवर अत्याचार, तिवसा येथील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा- अंगणात खेळत असलेल्या दहा वर्षीय दोन मुलींना फिरायला नेण्याच्या बाहण्याने घेऊन गेलेल्या एका २५ वर्षीय युवकाने त्यापैकी एका मुलीवर अत्याचार केला. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली. घाबरलेल्या मुलीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. दरम्यान पीडित मुलीने ही बाब शनिवारी पालकांना सांगितली. याप्रकरणी विनोद भीमराव मोहोड (२५) या युवकाला अटक करण्यात आली आहे.
परिसरतील एका गावात दोन दहा वर्षीय मुली अंगणात खेळत असताना विनोदने त्यांना फिरायला जाण्याचा बहाणा केला. मात्र विनोदने या मुलींना फिरायला नेता थेट स्मशानभूमीत नेले. तेथे दोघींपैकी एका मुलीवर अत्याचार केला. घाबरलेल्या चिमुरडीने याची वाच्यता कुठेही केली नाही. मात्र शनिवारी तिने पालकांना हा प्रकार सांगताच पालकांनी लगेच पाेलिस ठाणे गाठून तक्रार दिली.या तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी विनोदला अटक केली.