आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामधील २८ वर्षीय युवकाने लग्नाचे आमिष देऊन एका युवतीवर अत्याचार केला. याप्रकरणी युवतीने कुऱ्हा पोलिसांत युवकाविरुद्ध तक्रार दिली. मात्र, घटनास्थळ गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे या प्रकरणात त्या युवकाविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी रविवारी उशिरा रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अतुल ज्ञानेश्वर उंदरे (२८) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. अतुलची मागील दोन वर्षांपासून एका १७ वर्षीय युवतीसोबत ओळख होती. दरम्यान, अतुलने युवतीला लग्न करू, असे सांगून वर्षभरापासून अत्याचार केला. अतुलने लग्नास नकार दिला, असा आरोप पीडित युवतीने तक्रारीमध्ये केला आहे.