आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्मिळ उद मांजर रोडवर आढळले मृतावस्‍थेत, बघ्‍यांनी केली गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलढाणा - जिल्‍ह्यातील नांदुरा रोडवर उद मांजर प्रकारातील दुर्मिळ मांजर मृतावस्‍थेत आढळल्‍याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रामुख्‍याने रात्रीच दिसणारे हे मांजर अपघातात ठार झाले अशी माहिती वनविभागाच्‍या वतीने देण्‍यात आली आहे.
नांदुरा रोडवर सकाळी काही वाहनचालकांनी हे दुर्मिळ प्रकारातील मांजर पाहून आश्‍चर्य व्‍यक्‍त केले. परिसरातील नागरिकांनी मांजर पाहण्‍यासाठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती त्‍वरीत वनविभागाला देण्‍यात आली. पदाधिका-यांनी घटनास्‍थळी उद मांजराचा पंचनामा केला.
रात्री वावरणारा प्राणी
उद मांजर हा प्राणी प्रामुख्‍याने रात्री वावरतो. जंगलात बीळ करून राहणारा हा प्राणी रात्री वावरतो. उद मांजर हे बहुतेकदा स्‍मशानाजवळ आढळते. राज्‍यातील घनदाट जंगलांमध्‍ये हा प्राणी आढळतो. अशी माहिती वन्‍यजीव अभ्‍यासक डॉ. जयंत वडतकर यांनी दिली आहे.