आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांनाच का म्‍हणतात राष्‍ट्रसंत, ते स्‍वत:ला का म्‍हणत तुकड्या, वाचा 10 Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अंधश्रद्धा व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भजनं आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून समाजप्रबोधन करणारे राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 27 एप्रिल हा जन्‍मदिवस. समाजप्रबोधनासाठी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे धडे देणा-या राष्‍ट्रसंतांचे अख्‍खे आयुष्‍य चंदनासारखे झिजले. राष्‍ट्रसंतांच्‍या जयंतीनिमित्‍त आम्‍ही आपल्‍याला त्‍यांच्‍या आयुष्‍यातील काही प्रसंग सांगत आहोत.
- तुकडोजी महाराजांनी 1935 साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली.
- खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
- 1942 च्‍या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती.
- भारत हा खेड्यांचा देश आहे त्‍यामुळे ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची विचारसरणी होती.
- तुकडोजी महाराजांनी अमरावतीजवळ मोझरीला गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली.
- 23 एप्रिल 1947 ला श्री गुरूदेव आश्रम नागपूरचे उद्घाटन झाले.
- तत्‍कालिन राष्‍ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्‍यांना 'राष्‍ट्रसंत' ही उपाधी दिली.
- विश्‍वधर्म परिषद व विश्‍वशांतीसाठी ते सयाम, ब्रह्मदेश व जपान येथे गेले होते.
- तेथेही त्‍यांनी खंजिरी भजनातून सर्वांचा देव एकच आहे हे सांगितले.
- हर देश में तू, हर भेष में तू । तेरे नाम अनेक तू एकही है ।। असे त्‍यांचे कित्‍येक भजनं लोकप्रिय आहेत.
- भजनं लोकाभिमूख व्‍हावी यासाठी ते चित्रपटगीतांच्‍या चाली लावत.
- तत्‍कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गुरुकुंज मोझरीला 1956 मध्‍ये भेट दिली होती.
- चीन (1962) व पाकिस्‍तान (1965) यांच्‍याशी झालेल्‍या युद्धात सैन्‍याला धीर देण्‍यासाठी त्‍यांनी सिमेवर जाऊन विरगीतांचे गायन केले होते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, तुकडोजी महाराजांबाबत या दहा विशेष बाबी...