आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात रेव्ह पार्टी.. नशेत तर्रर्र झिंगाट तरुण-तरुणी; ... तरी पोलिसांनी सोडून दिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- जरीपटका पोलिसांना बुधवारी (13 सप्टेंबर) रात्री उशीरा एका रेव्ह पार्टीचा भांडाफोड केला. पोलिसांनी सापळा रचून एका फार्महाऊसवर छापा टाकला. घटनास्थळाचा पंचनामा करत  आरोपी तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. पोलिस व्हॅनमध्ये बसवून ठाण्यात आणले. सगळ्याची मेडिकलही झाली. तरुण-तरुणी नशेत तर्रर्र होते. परंतु पोलिसांनी केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करून सगळ्यांना चक्क सोडून दिल्याचे आता समोर आले आहे.

आता तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. व्हिडिओद्वारा त्या रात्रीचे 'काळे' सत्य चव्हाट्यावर आले आहे. फार्म हाऊसवर तरुण-तरुणी रेव्ह नव्हे तर बर्थडे पार्टी करत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यामुळे नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

अशी उजेडात आली रेव्ह पार्टी...
- कामठी मार्गावरील एका फार्महाऊसवर रेव्ह पार्टी सुरु असल्याची गोपनिय माहिती जरीपटका पोलिसांना मिळाली होती.
- पोलिसांनी खसाडा येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विक्रम नामक व्यक्तिच्या आलिशान फार्महाऊस सापळा रचून छापा टाकाला.
- सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पोलिसांनी नशेत तर्रर्र अनेक तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. त्यापैकी काही तरुण-तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत होते.
- पारडी येथील राहाणारे रोहन आणि उज्ज्वल नामक दाम्पत्याने या रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते.
- पोलिसांनी सर्व तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. रात्री उशीरा त्यांना पोलिस ठाण्यात आणले. सगळ्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली.
-  तरुण-तरुणींनी नशा केल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले होते. तरी देखील राजकीय दबावामुळे पोलिसांनी केवळ प्रतिबंधात्मक कारवाई (कलम 110,117) करून आरोपींची सुटका केली.
- दरम्यान, या रेव्ह पार्टीत एका महिला अधिकार्‍याच्या पतीचा समावेश होता. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गुंडाळल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी मौन धारण केले आहे.

पोलिस म्हणाले, रेव्ह नव्हे, बर्थडे पार्टी होती...
- जरीपटका पोलिस ठाण्याचे उपपोलिस निरीक्षक एस.जी. खेडेकर यांनी सांगितले की, खसाडाजवळ रेव्ह पार्टी सुरु असल्याची सूचना मिळाली होती. परंतु खसाडा येथील फार्म हाऊसवर छापा मारला असता तिने बर्थडे पार्टी सुरु होती. तरुणी, फॅमिलीसोबत आल्या होत्या.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ मागवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. सध्या या प्रकरणाची चौकशी डीसीपी झोन 5 चे कृष्णकांत उपाध्याय हे करत असल्याचे नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम् यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... सोशल मीडियावर व्हायरल झालेला नागपुरातील रेव्ह पार्टीचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...