आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडागर्दीचे आदेश द्याल तर शिवसेनेला जशास तसे उत्तर देऊ; रवी राणांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/अमरावती- शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरुन गुंडागर्दीचे आदेश दिले जात असतील, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ. असा इशारा अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिला आहे. येत्या दसऱ्याला जर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा केली, तर शिवसेनेला खिंडार पडेल. 3 ते 4 मंत्र्यांचा समावेश असलेले त्यांचे 20 ते 22 आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर असतील आणि त्याचे सर्व पुरावे मी माध्यमांना देईन, असा दावा राणा यांनी केला.
 
सत्तासुद्धा उपभोगायची आणि सत्तेत राहून विरोधकांसारखी टीकाही करायची, असे पहिल्यांदाच घडले आहे. मुख्यमंत्री सक्षम असल्यामुळे भाजपचा आलेख चढता राहिला आहे, तर शिवसेनेचा आलेख घसरला आहे, असे रवी राणा म्हणाले. आमचा भाजपला पाठिंबा आहे, मात्र पक्षात जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विदर्भात राणा समर्थक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाले आहेत. गेल्या शनिवारी नागपुरात आमदार रवी राणा यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. यामागेही शिवसेनेचा हात असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. दरम्यान सत्तेतून बाहेर पडू नये साठी मराठवाड्यातील आमदार उद्धव यांना आवाहन करणार असल्याचे वृत्त एका खासगी वृतवाहिनीने दिले आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...