आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू अड्ड्यावर धाड; पावणे पाच लाख जप्त, फ्रेजरपुराच्या हद्दीत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. २) पहाटे कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान परिहारपुऱ्यात गावठी दारू गाळणाऱ्या एका महिलेच्या घरातून तब्बल लाख ८० हजार ६०० रुपयांची रोख तब्बल ७६ ग्रॅम सोन्याचे दागिने आढळून आल्याने पोलिसांनी ते जप्त केले आहे.

फ्रेजरपुराचे ठाणेदार प्रमेष आत्राम गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल किनगे यांच्यासह गुन्हे शाखा फ्रेजरपुरा ठाण्याचे ३५ ते ४० कर्मचारी तसेच १७ परिविक्षाधीन पीएसआय या ताफ्याने फ्रेजरपुरा, पारधीपुरा, कुंभारपुरा अन्य परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून गावठी दारूच्या भट्ट्यांवर धाड टाकून १६ हजार ५०० रुपयांची गावठी दारू तसेच मोह सडवा तसेच इतर साहित्य असा एकूण १६ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. यावेळी जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. याच मोहिमेदरम्यान परिहारपुऱ्यातील एका महिलेच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता एका पिशवीमध्ये काही ग्लास लाख ८० हजार ६०० रुपये रोख तसेच ७६ ग्रॅम सोने ७० ग्रॅम चांदीचे दागिने मिळून आले.दागिने रोख रकमेबाबत महिलेला विचारले असता त्या महिलेकडून पोलिसांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे पोलिसांनी ही रोख दागिने जप्त केले.या कारवाईमध्ये फ्रेजरपुराचे एपीआय रोशन शिरसाठ, एपीआय फिरोज खान पठाण, पीएसआय राम गित्ते यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

म्हणून राेख रकमेसह सोने केले जप्त
^कोम्बिंगऑपरेशनदरम्यान दारू गाळणाऱ्या विक्री करणाऱ्या महिलेच्या घरातील पिशवीत लाख ८० हजार ६०० रुपये रोख ७६ ग्रॅम सोने ७० ग्रॅम चांदी मिळून आली. याबाबत महिलेने समाधानकारक उत्तरे दिले नाही, त्यामुळे आम्ही रोख दागिने जप्त केले आहे. तपास सुरू आहे. प्रमेषआत्राम, ठाणेदार फ्रेजरपुरा.
बातम्या आणखी आहेत...