आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेकाॅर्डब्रेक कामकाज! विषयपत्रिकेला महापौरांनी घेतले गांभीर्याने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन अलीकडच्या काळातील महापालिकेची शनिवारी (१९ मार्च) झालेली सर्वसाधारण सभा रेकाॅर्डब्रेक ठरली. जनतेसाठी महत्त्वपूर्ण असलेले विषय तसेच नगरसेवकांकडून शहर विकासाबाबत मांडण्यात आलेल्या प्रस्तावांना घेऊन सकाळी ११ वाजता सुरू झालेली सभा सायंकाळी वाजता म्हणजेच तब्बल तास चालली. दिव्य मराठीच्या वृत्ताची दखल घेत एकाच विषयावर लांबणाऱ्या चर्चेला महापौर रिना नंदा यांनी विराम लावला.
शहर विकास तसेच जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले नगरसेवकांकडून मांडण्यात आलेले तब्बल २६४ प्रस्ताव प्रलंबित असल्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रकाशित केले होते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या वृत्ताचा चांगलाच परिणाम दिसून आला. पूर्वी प्रश्नोत्तराच्या तासात एका विषयावर प्रस्तावाप्रमाणे चर्चा करणारे चित्र आजच्या सभेत पूर्णपणे बदलले असल्याचे जाणवून आले. प्रश्नावर एका सदस्यांसोबत दुसरी कोणी बोलण्यास आल्यास त्याला महापौरांकडून समजदेखील देण्यात आली. प्रशासकीय विषय संपल्यानंतर प्रस्तावांवर चर्चा करत कार्यक्रम पत्रिका शून्य करणार असल्याचे महापौरांनी यादरम्यान वारंवार घोषित केले. प्रश्नोत्तरादरम्यान चर्चा वाढत असल्याने पक्षनेते बबलू शेखावत यांनी कार्यक्रम पत्रिका शून्य करण्याची सूचना केली होती. शेखावत यांच्या सूचनेचा आदर सदस्यांकडून करण्यात आल्याने अर्धा तास चाललेल्या प्रश्नोत्तराच्या तासात पाच प्रश्नांवर समाधानकारक चर्चा झाली. यादरम्यान सर्व सदस्यांना सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचनादेखील महापौरांकडून करण्यात आल्या. त्यानंतर प्रशासनाकडून आलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली. जीओ टॅक्स या सायबर टेक कंपनीच्या मालमत्ता सर्वेक्षणातून करवसुली प्रणालीच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वसामान्य जनता तसेच प्रशासनाचा कमकुवतपणा शोधण्याची संधी मिळाल्याने सदस्यांनी देखील या विषयाला गांभीर्याने घेतले. शिवाय सर्वांसाठी घर या प्रधानमंत्री अावास योजनेबाबत सदस्यांकडून आलेल्या आक्षेपांचे समाधान आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडून करण्यात आले. प्रशासनाकडून अालेल्या १३ विषयांवर चर्चा करत निर्णय घेतल्यानंतर तब्बल सायंकाळी ५.३० वाजता नगरसेवकांकडून आलेल्या प्रस्तावांवर चर्चा आरंभ करण्यात आली. प्रस्तावांवर चर्चा सुरू झाली त्या वेळी सभागृहात मोजकेच सदस्य उपस्थित होते, त्यामुळे अनुपस्थित सदस्यांचे प्रस्ताव कार्यक्रम पत्रिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी सर्व सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.


दीड तासात २८ प्रस्ताव निघाले निकाली
सायंकाळीनगरसेवकांकडून आलेल्या प्रस्तावांवर चर्चा सुरु करण्यात आली. या वेळी सभागृहात दीड तासात २६४ पैकी २८ प्रस्ताव चर्चा करत निकाली काढण्यात आले. प्रस्ताव मंजूर करण्यात आले, तर २६ प्रस्ताव सदस्य अनुपस्थित असल्याने तसेच मागे घेण्यात आल्याने खारीज करण्यात आले. शिवाय अनावश्यक असलेले प्रस्ताव कार्यक्रमातून काढले जाणार असल्याचे महापौरांनी या वेळी स्पष्ट केले.

समन्वयाचा होता अभाव
माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांच्याकडून महापौर चषक आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव १८ डिसेंबर २०१३ रोजी मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर तब्बल अडीच वर्षांनंतर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान शिक्षण क्रीडा विभागात समन्वय नसल्याचे निदर्शनास आले, यावर संतप्त होत बांबल यांनी ‘गंमत करून राहिले का’, असा दम दोन्ही विभागाला भरला.
बातम्या आणखी आहेत...