आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Renewable Energy Option Before World Dr.Mohan Kolhe

नित्यनावीन्य ऊर्जेचे जगासमोर आहे पर्याय, डॉॅ. मोहन कोल्हे यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नैसर्गिक तेलावर अर्थव्यवस्था केंद्रित असली, तरी आगामी काळात नित्यनावीन्य ऊर्जेचा जगासमोर पर्याय राहणार अाहे,अशी माहिती नार्वे येथील अग्डेर विद्यापीठातील प्रा.डॉ. मोहन कोल्हे यांनी दिली. नार्वे भारत सरकारच्या संयुक्त उपक्रमातून अमरकंटक येथे शैक्षणिक प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी भारतात आले असता अमरावती येथील भेटीदरम्यान डॉ. कोल्हे यांनी ही माहिती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी जानेवारीला झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

नार्वे येथील अग्डेर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विज्ञान विभागात डॉ. मोहन कोल्हे हे विद्युत अभियांत्रिकीचे प्राध्यापक असून, त्यांचा ‘विद्युत अभियांत्रिकी नित्यनावीन्य ऊर्जा’ याचा आंतरराष्ट्रीयस्तरावर दोन दशकांपेक्षा जास्त अनुभव आहे. ग्लोबल वार्मिंगलादेखील हे ऊर्जेेचे स्त्राेत कारणीभूत ठरत आहे, त्यामुळे नित्यनावीन्य ऊर्जा त्यावरील उत्तम उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. २०५० पर्यंत युरोपियन युनियनमधील देश तेलाच्या अर्थव्यवस्थेतून हायड्रोजन अर्थव्यवस्थेवर जाणार असल्याचे संकेत त्यांनी व्यक्त केले. हायड्रोजनपासून ऊर्जा निर्मिती केल्यास पर्यावरणास त्याचा लाभ होईल, शिवाय नैसर्गिक तेलाचे भांडार सीमित झाल्यानंतर पर्याय म्हणून त्याचा उपयोग आतापासूनच करता येणे शक्य आहे. इमारतीत वापरण्यात येणाऱ्या ऊर्जेचे व्यवस्थापन कशाप्रकारे करता येते, याबाबत त्यांचा प्रकल्प दोन देशांमध्ये अवलंबला जात आहे. नार्वे आणि स्विझर्लंड या दोन देशांत प्रत्येकी १०० घरांमध्ये हा प्रयोग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर लागू केला. कार्बन तसेच अधिक ऊर्जा वापरापासून सुटका मिळाली, शिवाय स्मार्ट हाऊसेसदेखील निर्माण करणे शक्य झाले. ऑस्ट्रेलिया जपानमध्ये त्यांनी पवन ऊर्जा प्रकल्पावर कार्य केले आहे. नित्यनावीन्य ऊर्जा साठवून ठेवत विजेची कमीदेखील भरून काढता येत असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेपूर्वी डॉॅ. कोल्हे यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉ. डी. जी. चौधरी डॉ. व्ही. बी. विरुळकर उपस्थित होते.

स्मार्ट सिटीला उपयुक्त नित्यनावीन्य ऊर्जा
स्मार्टसिटी होणार असल्याने अमरावतीतदेखील नित्यनावीन्य ऊर्जेचा प्रकल्प यशस्वी होऊ शकत असल्याचे डॉ. कोल्हे यांचे म्हणणे आहे. डॉ. कोल्हे यांनी अमरकंटक येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठासोबत नित्यनावीन्य ऊर्जेच्या शैक्षणिक प्रकल्पाबाबत करार केला आहे. नार्वे आणि भारताचा हा संयुक्त शैक्षणिक प्रकल्प राहणार आहे. अशाच प्रकारचा संयुक्त प्रकल्प शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत करता येणे शक्य अाहे. या संयुक्त प्रकल्पाच्या कराराबाबत चर्चा केल्याची माहिती प्राचार्य डॉ. डी.जी. चौधरी यांनी दिली.

‘नित्यनावीन्य ऊर्जेचे अग्रणी तंत्रज्ञ’ आेळख
डॉ.मोहन कोल्हे यांची नित्यनावीन्य ऊर्जा विषयात जगातील अग्रणी तंत्रज्ञ म्हणून ओळख आहे. जगातील प्रतिथयश विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. शैक्षणिक कार्याशिवाय नित्यनावीन्य ऊर्जा जोडणी, स्मार्टग्रीड, हायड्रोजननिर्मिती, फ्यूल सेल यांचा छोट्या वाहनांमध्ये वापर, ऊर्जा व्यवस्थेचा तंत्र-आर्थिक उपयोग, सौर ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात ऊर्जा व्यवस्था, अभियांत्रिकी अर्थशास्त्रामध्ये शिकवण्याचा अनुभव आहे. ईपीआरसी, बीबीएसआरसी, ईयू, एनआरपी अादी जागतिक संस्थांकडून त्यांना संशोधनासाठी निधीदेखील प्राप्त झाला आहे.