आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी प्रश्नांवर उत्तरे देताना राज्यमंत्री सदाभाऊ खोतांची भंबेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जाहीर सभांमधून अाक्रमकपणे मुद्दे मांडणारे स्वाभिमानी शेतकरी पक्षाचेे नेते सदाभाऊ खाेत यांची कृषी राज्यमंत्री म्हणून हेच प्रश्न साेडवताना कशी भंबेरी उडतेय याचा अनुभव बुधवारी विधानसभेत अाला. विराेधी अामदारांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाचे सदाभाऊ समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे विराेधी पक्षनेत्यांसाेबत बैठक घेऊन त्यांनी या प्रश्नावर समाधानकारक माहिती मिळवावी, असे निर्देश देत तालिका अध्यक्षांनी पीकविम्याबाबतची लक्षवेधी राखून ठेवली.

या वर्षीपासून लागू करण्यात अालेल्या पंतप्रधान पीक विमा याेजनेतून भरपार्इ मिळण्यास शेतकऱ्यांना अनंत अडचणी येत अाहेत. तसेच टाेल फ्री नंबरही बंद असतात त्यामुळे शेतकऱ्यांना याेग्य ती माहिती मिळू शकत नाही, असा प्रश्न विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. तसेच हवामानावर अाधारित जुन्या पीक विमा याेजनेत व नव्या याेजनेतील विमाहप्ता रकमेत किती फरक अाहे, अाजवर जुन्या व नव्या याेजनेतून किती भरपार्इ देण्यात अाली? असे प्रश्नही विखेंनी उपस्थित केले. त्यावर गेल्या वर्षी १ काेटी ६ लाख शेतकरी जुन्या याेजनेत सहभागी झाले हाेते. त्यांना भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू अाहे, एवढेच उत्तर खाेत यांनी दिले. नवीन याेजनेत किती शेतकरी सहभागी झाले, त्यांनी किती प्रीमियम भरला याची माहिती ते देऊ शकले नाहीत. या उत्तराने विराेधकांचे समाधान झाले नाही, त्यांनी खाेतांवर प्रश्नांचा भडिमार सुरू केला.

‘मागील वर्षी नुकसान झालेल्या ३४ लाख शेतकऱ्यांची ६८ काेटींची भरपार्इ अद्याप मिळू शकलेली नाही. तसेच जुन्या पीक विमा याेजनेत उत्पादनाच्या कमाल १४ टक्के हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागत हाेता. ताेच अाता पंतप्रधान पीक विमा याेजनेत ४५ टक्क्यांपर्यंत गेला अाहे. विमा कंपन्यांचा फायदा करण्यासाठी शेतकऱ्यांची ही लूट केली जात अाहे,’ असा अाराेप विखेंनी केला. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान भरपार्इ देण्याची प्रक्रिया सुरू अाहे, जानेवारीअखेर सर्व भरपार्इ दिली जार्इल, एवढेच उत्तर खाेत अडखळत-अडखळत देत हाेते. त्यावर समाधान न झाल्याने अखेर विखे पाटलांनी ही लक्षवेधीच राखून ठेवण्याची मागणी केली. तालिका अध्यक्षांनी खाेतांना उत्तर देण्याची अनेकदा संधी दिली, मात्र पुरेशा तयारीविना अालेले खाेत याेग्य उत्तरे देऊ शकले नाहीत. अखेर ही लक्षवेधी राखून ठेवण्याचे निर्देश तालिका अध्यक्षांनी दिले.
कंपन्यांकडून पैसे वसूल करणार का : जयंत पाटील
राष्ट्रवादीचे अामदार जयंत पाटील यांनीही राज्यमंत्री खाेत यांना टाेले लगावले. ‘सदाभाऊंना हे खाते नवीन अाहे. अधिकाऱ्यांकडून चिठ्ठीवर येत असलेली माहिती वाचून ते गाेंधळले अाहेत. सभागृहात उत्तर देण्याची तयारी करूनही ते गाेंधळलेले दिसतात. शेजारी विजयकुमार गावित बसले असल्याने सदाभाऊंचा हा गाेंधळ हाेत अाहे,’ अशी टाेलेबाजी जयंतरावांनी केली. त्याला दाेन्ही बाजूच्या सदस्यांनी हसून दाद दिली. दरम्यान, ‘नरड्यावर बसून शेतकऱ्यांचे प्रश्न साेडवू,’ अशीच भाषा नेहमी करणारे सदाभाऊ अाता त्याच पद्धतीने विमा कंपन्यांकडे अडकलेली शेतकऱ्यांची भरपार्इ वसूल करणार का?’ असा खाेचक प्रश्नही त्यांनी विचारला. त्यावर मात्र कंपन्यांची गय करणार नसल्याचे सदाभाऊंनी ठासून सांगितले.
जानकर, रामदास कदम मदतीला धावले
विराेधकांकडून प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना मंत्री महादेव जानकर सदाभाऊंच्या अासनाजवळ जाऊन बसले व त्यांना काही सूचना करू लागले. तसेच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही खाेतांची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. ‘जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या पीकविम्याची सर्व रक्कम दिली जाईल, असे खाेत सांगत असताना विराेधक मात्र या प्रश्नाचे राजकारण करत अाहेत,’ असा अाराेप त्यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...