आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचनेसह आरक्षण जाहीर, महापालिकेत महिलांसाठी ४४ प्रभाग राखीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - फेब्रुवारी२०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेसह आरक्षणाची सोडत शुक्रवारी (७ ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली असून, राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार मनपा टाॅऊन हॉल येथे आयुक्त हेमंत पवार यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता नवीन रचनेनुसार एकूण २२ प्रभागातील राखीव जागांसाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये महिलांसाठी ४४ प्रभाग राखीव ठेवण्यात आले असून,अनुसूचित जाती १५, अनुसूचित जमाती तर इमावसाठी २३ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. एसआरपीएफ क्षेत्रफळाने मोठे प्रभाग ठरणार आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने २०११ च्या जनगणनेनुसार शहरातील लाख ४७ हजार ०५७ लोकसंख्येचा आधार राखीव जागांची सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातीच्या लाख ११,४३५ लोकसंख्येनुसार १५ तर अनुसूचित जमातीच्या १५ हजार ९५५ लोकसंख्येनुसार जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. इतर मागासवर्यीय प्रवर्गातील २३ सदस्यांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या. एका प्रभागात चार सदस्य राहणार असून त्यांच्या जागास अ, ब, क, असे संबोधले जाणार आहे. २१ प्रभाग चार तर एका प्रभागात तीन सदस्य राहणार आहे. प्रत्येक प्रभागात महिलांसाठी दोन जागा राखीव राहाव्या म्हणून आरक्षणाची सोडत काढण्यात आली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय या प्रवर्गासाठी इश्वर चिठ्ठीने आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सर्वप्रथम लोकसंख्येच्या आधारे निश्चित अनुसूचित जातीच्या १५ मधून महिलांच्या जागा तर अनुसूचित जमातीच्या मधून महिलांच्या एका जागेसाठी सोडत काढण्यात आली. त्यानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या एकूण २३ पैकी १२ जागा महिलांसाठी राखीव राहाव्यात म्हणून सोडत काढण्यात आली. इमावच्या २३ पैकी २१ जागा निवडणूक आयोगाने नेमून दिल्या होत्या. उर्वरित दोन जागांसाठी सोडत काढण्यात आली. प्रभाग क्रमांक मध्ये जागा असून त्यापैकी दोन जागा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीकरिता आरक्षित आहे. त्यामुळे या प्रभागात इमाव करिता जागा देण्यात आली नाही. त्यानंतर टप्पा-टप्पाने आरक्षणाची सोडत विद्यार्थ्यांच्या हाताने इश्वर चिठ्ठीद्वारे करण्यात आली. यावेळी आयुक्त हेमंत पवार, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त योगेश पीठे, महेश देशमुख, निवेदिता घार्गे, सोनाली यादव, पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. नगर सचिव मदन तांबेकर यांनी आरक्षण सोडतीचे संचालन केले. कार्यालय अधीक्षक दुर्गादास मिसाळ, नंदकिशोर पवार, युगंधरा ठाकरे, अक्षय निलंगे, भूषण पुसतकर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बातम्या आणखी आहेत...