आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण जाहीर; इच्छुकांचा हायटेक प्रचार सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. काही दिग्गजांना नविन मतदारसंघ शोधावे लागणार आहे तर बहूतांश मतदारंसघामध्ये नविन चेहरे उदयास येणार आहे. सोशल माीडियाचा भरभरुन वापर होणारी जिल्हा परिषद, नगर परिषद महापालिकांची ही पहिलीच निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने नव्या पिढीच्या हातात पोहचलेले स्मार्ट फोनने आतापासूनच किमया दाखवणे सुरू केली आहे. सोशल मीडियावर इच्छूकांनी आतापासून प्रचाराची धुम सुरू केली आहे. त्यामुळे व्हाट्सअप इतर सोशल मीडिया प्रचाराचे प्रमुख साधन ठरत आहे.
अमरावती महापालिकेसाठी यंदा २२ प्रभाग तयार करण्यात आले आहे. यावेळी ज्या पद्धतीने प्रभाग रचना झाली आहे, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी निवडणुकीसाठी तयारी केली, त्यापैकी बहूतांश इच्छूकांना त्याच ठिकाणाहून निवडणूक लढवता येणार आहे. कारण अमरावती महापालिकेच्या इतिहासात पहिल्यादांच एका प्रभागात चार नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. त्यामुळे मतदारांची संख्या वाढली, संख्या वाढल्यामुळे परिसर वाढला. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अशावेळी उमेदवारांना सोशल मीडियाचा प्रचारासाठी आधार होणार आहे. हीच संधी साधून अनेकांनी तर आरक्षण जाहीर होताच व्हाट्सअपवर प्रचाराचे नारळ फोडले आहे. महापालिकांसोबतच ग्रामीण भागात जिल्हा परिषद नगर परिषदसाठी निवडणूक होणार आहे. शहराप्रमाणेच ग्रामीणसुद्धा सोशल मीडिया महत्त्चा ठरणार आहे.महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय लोकसंख्येनुसार राखीव जागांसाठी आरक्षण जाहीर केले. अनेक विद्यमान नगरसेवकांवर त्यांचा मतदार संघ बदलण्याची वेळ आली आहे. काही नगरसेवकांना त्यांच्या बाजूच्या मतदार संघात शरण घ्यावी लागेल, शिवाय अनेक विद्यमान नगरसेवकांना आमने-सामने लढावे लागणार आहे.

व्हाट्सअप ठरणार प्रभावी
सद्या स्थितीत ९० टक्के मतदारांच्या खिशात विशेषत: तरुण मतदारांजवळ स्मार्ट फोन आहेत. फ्लेक्स, जाहिराती या प्रचारासोबत व्हाट्सवरील प्रचारसुद्धा उमेदवारांना महत्त्वाचा आधार देणार आहे. रस्त्यावरील फ्लेक्स, घरात आलेले पत्रक वाचण्यासाठी कदाचित वेळ मिळणार नाही मात्र व्हाट्सअप वापरणारी व्यक्ती दिवसातून सरासरी तासाला एकदा तरी व्हाट्सअप उघडून पाहते. त्यामुळे प्रचाराच्या इतर माध्यमांच्या तुलनेत यावर्षीच्या निवडणुकीत व्हाट्सअप प्रभावी ठरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...