आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम आरक्षणाबाबत काँग्रेस- राष्ट्रवादीने काहीही केले नाही, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर :आघाडी सरकारची राज्यात आणि केंद्रात सत्ता असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लिम आरक्षणाबाबत काहीही केले नाही. आता त्यांना अचानक मुस्लिम आरक्षणाबाबत बोलावेसे वाटत आहे. नसीम खान यांनी सत्तेत असताना मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत काहीही पावले उचलली नाहीत. मात्र, आता ते आपलेपणा दाखवत आहेत, अशी टीका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी विधानसभेत मुस्लिम आरक्षणावर बोलताना केली.

मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत, कोळी आणि अन्य मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत प्रस्ताव मांडला. चर्चेत भाग घेताना जलील म्हणाले, मराठ्यांना आरक्षण मिळावे असे आम्हालाही वाटते. परंतु सगळ्यांनीच मुस्लिम आरक्षणाबाबतही विचार केला पाहिजे.
भाजपने आम्हाला कधीही आपले म्हटले नाही. मात्र, याचा आम्हाला राग नाही कारण आमचे विचार त्यांच्याशी जुळत नाहीत. परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सेक्युलर म्हणवून घेत आमचा नेहमी वापर केला. त्यांच्यावर आमचा खूप राग आहे. नसीम खान आता मुसलमानांविषयी कळवळा दाखवत आहेत. मात्र, त्यांचे हे मगरीचे अश्रू आहेत.
राष्ट्रवादीवरही आमचा राग आहे. शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली तेव्हा ते मुस्लिम आरक्षणाबाबत पंतप्रधानांशी बोलतील, असे वाटले होते. मात्र, त्यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत काहीही म्हटले नाही. शिवसेनेने मात्र मुस्लिम आरक्षणाच्या बाजूने मत मांडले आहे.

..तर विनोद पाटील यांना दिले यश
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी औरंगाबाद येथील विनोद पाटील यांनी त्यापूर्वीच न्यायालयात धाव घेतली. मराठ्यांना आरक्षण मिळाले तर हे पाटील यांचेच यश आहे, असे राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

एकनाथ खडसेंचे आभार
भाजप सरकारचे विशेषतः माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे अभिनंदन करतो, कारण त्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी मुस्लिमा समाजाला परत मिळवून दिल्या. प्रथमच वक्फ बोर्डाच्या जमिनीवर मुसलमानांसाठी लग्नाचा हॉल बांधून देण्याची योजना आखली. भाजप-शिवसेनेबरोबर आमचे विचार जुळणार नाहीत. मात्र, दोन रुळांवर चालणाऱ्या रेल्वेप्रमाणे आम्ही एकत्र प्रवास करू, असेही जलील म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...