आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेनोडा, सातनूर येथे महसूल प्रशासनाची अवैध बोअरप्रकरणी महसूल प्रशासनाची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड - ड्रायझोन म्हणून घोषित असलेल्या तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात अवैध बोअर विहिरींच्या कामांचा सपाटा शेतकरी नागरिकांनी चालवला होता. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत महसूल प्रशासनाने गुरुवारी रात्री धडक कारवाई करीत बेनोडा शहीद सातनूर परिसरात दोन बोअर मशीनवर कारवाई करीत तहसीलदारांनी त्या ताब्यात घेतल्या. 

या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ड्राय झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यात नवीन बोअर विहिरींच्या खोदकामाला मनाई असतानाही काही शेतकऱ्यांनी नागरिकांनी रा़त्रीच्या अंधारात शेतात बोअर करण्याचा सपाटा चालवला होता. दैनिक ‘दिव्य मराठी’ने त्याबाबत वृत्तही प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत तहसीलदार आशिष बिजवल यांनी तालुक्यात कुठे अवैध बोअरिंग सुरू असल्यास नागरिकांनी महसूल प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले होते. 

दरम्यान गुरुवारी बेनोडा शहीद परिसरातील गोरेगाव मार्गावर झोंबाडीजवळ गजानन बोंदरे यांच्या शेतात, सातनूर येथे किसन शिरभाते यांच्या शेतात बोअर करण्यात येत अाहे,अशी माहिती तहसीलदार यांना दिली. तहसीलदार यांनी क्षणाचाही विलंब लावता सापळा रचून बेनोडा येथून केए ०१/ सी ०३९२ केए ०१/ एमएच ६८८६ तर सातनूर येथून अंबाडा येथील रहिवाशी राजेश खेरडे यांच्या मालकीची एमएच ०१/ ६०८० एमएच ०१/ एबी १०८० अशा एकूण चार बोबर मशीन ताब्यात घेऊन त्या बेनोडा शहीद शेंदुरजनाघाट पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्यात. 

झाकून ठेवण्यात येत होते बोअर 
शेतात केलेले बोअर कुणालाही दिसू नये म्हणून ते काट्या, कुटक्या, पोते, तणस गवताने झाकून ठेवण्याची शक्कल तालुक्यातील, जामगाव, बारगाव, लोणी, बेनोडा, टेंभुरखेडा, गव्हाणकुंड, भेमडी, शेदुरजनाघाट परिसरातील शेतकऱ्यांनी लढवली होती, परंतु प्रशासनाने कारवाई करण्याचा आवाहनाला काही सजग शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत अवैध बोअर होत असल्याची माहिती प्रशासनाला देऊन यावर वचक निर्माण करत पर्यावरणाचा समतोल साधण्यास मदत केली आहे. 

कठोर कारवाई करण्यात येईल 
यापूर्वीही अवैध बोअर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडून स्टँप पेपरवर लिहूनही घेण्यात आले होते. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थेच होत असल्याने अवैध बोअर करणाऱ्या मशीन पकडून उपविभागीय अधिकारी मनोज कडू यांच्याकडून रीतसर माहिती घेऊन संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.’’- आशिषबिजवल, तहसीलदार 

अवैध बोअरिंगवाल्यांचे तालुक्यात दणाणले धाबे 
तालुका ड्राय झोन म्हणून घोषित असतानाही पावसामुळे तालुक्यात पाण्याची पातळी वाढली. त्याचाच फायदा घेत शेतात सिंचनासाठी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेता तालुक्यात अवैध बोअरिंग च्या कामाने वेग घेतला होता. मात्र गुरुवारी झालेल्या धडक कारवाईमुळे अवैध बोअर करणाऱ्या शेतकऱ्यांचे तसेच मशीन मालकांचे धाबे दणाणले आहे. 
बातम्या आणखी आहेत...