आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो महसूल कर्मचाऱ्यांची ‘आयजीं’कडेे धाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अपंग निराधार महिलांना निराधार योजनेच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या नायब तहसीलदार नंदकुमार काळे यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी (दि. ३) जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. काळे यांनी संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी सुमारे दोनशे अर्जादारांच्या अर्जात शुल्लक त्रुटी काढून परत पाठविल्या. यात प्रामुख्याने अर्जाला केवळ पाच रुपयाचे तिकीट लावलेल्या त्रुटीच्या अर्जांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गरीब नागरिक अनुदानापासून वंचित राहिले. त्यामुळे काळे यांची त्रुटी विषयक चौकशी करावी,वरूड तहसीलमधील धान्य पुरवठा विभागातील मद्यपी कर्मचाऱ्याची बदली करावी आदी मागण्या डॉ. बोंडे यांनी केल्या आहेत.
चारदिवंसापुर्वी आमदार डाॅ. अनिल बोंडे यांनी वरूडच्या नायब तहसीलदाराला थापड मारल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द पोलिसांत गुन्हे दाखल होऊन ग्रामीण पेालिसांनी आमदारांना अटक केली नाही. त्यांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी सोमवारी (दि. ३) महसूल विभागाचे हजारो कर्मचारी, अधिकारी परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्याकडे धाव घेऊन निवेदन सादर केले. दरम्यान, साेमवारीच विभागीय आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले.

आमदार डाॅ. बोंडेंना तत्काळ अटक झाल्यास मंगळवारपासून (दि. ४) अमरावती विभागातील महसूल अधिकारी कर्मचारी लेखणीबंद करणार असल्याचा इशारा या वेळी देण्यात आला. . आमदार बोंडे हे शहरात हजर आहे, असे असतानाही पोलिस त्यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी निवासी, उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण ठाकरे, मनोहर कडू, रामदास शिद्धभट्टी, डी. के. वानखडे, ललितकुमार वऱ्हाडे, विनोद शिरभाते, तहसीलदार प्रदीप पवार,राम लंके, विवेक कळकर,श्रीकांत उंबरकर, वैशाली पाथरे, अनिल भटकर, नायब तहसीलदार रवी महाले, संजय कडू,अरविंद माळवे,एस. के. कल्याणकर ,प्रशांत अडसुळे, धीरज मांजरे, नीता लबडे, निकिता जावरकर, अव्वल कारकून नामदेव गडलिंग, अविनाश हाडोळे, अंबादास काकडे, आशिष ढवळे,सचिन पावार, अमोल सोळंके, गरगल, मंडळ अधिकारी मंगेश सोळंके, विष्णू सव, मनीष देशमुख आदी उपस्थित होते.

तीनहजार लेखणी बंद
आमदारडाॅ. अनिल बोंडे यांना तत्काळ अटक करावी,या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील हजार कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद करून विभागीय आयुक्तांना िनवेदन दिल्याचे तहसीलदार सुरेश बगळे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...