आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सात्त्विक कंपनी’ प्रकरणी सक्षम प्राधिकारी नियुक्त, आमिष देऊन केली होती नागरिकांची फसवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ३६ महिन्यांत गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या नागपूर येथील ‘सात्त्विक इन्व्हेस्टमेंट कंपनी’प्रकरणात राज्य शासनाने अमरावतीचे उपविभागीय अधिकाऱ्यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश अणे यांनी मंगळवारी (दि. ६) दिली.

आमिष दिल्याप्रमाणे रकमेचा परतावा मिळाल्यामुळे शहरात राहणारे रमेश मधुकरराव कोलते (५८) यांनी १२ मे २०१५ ला गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी अमोल जगन्नाथ ढाके (४०, नागपूर) याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.
आर्थिक गुन्हे शाखेने तपासादरम्यान सात्त्विकच्याच अन्य कंपनीद्वारे खरेदी करण्यात आलेले तब्बल १८ लाख रुपयांचे इनव्हर्टर खरेदी करण्यात आले. दरम्यान कोलते यांच्यासह अन्य एक अशा दोन तक्रारदारांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश अणे, उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान जप्त केलेले १८ लाखांचे इन्व्हर्टर हे गुंतवणूकदारांच्या रकमेतूनच खरेदी केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले होते.
त्यामुळेच शासनाकडून या प्रकरणात सक्षम प्राधिकारी म्हणून अमरावतीचे उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. असे पत्र आर्थिक गुन्हे शाखेला शासनाकडून प्राप्त झाले आहे. या प्रकरणात सक्षम प्राधिकारी पुढील प्रक्रीया पार पाडतील. या कारवाईमुळे फसगत झालेल्या दोन्ही गुंतवणूकदारांना रक्कम परत मिळण्याची अपेक्षा आहे.

गुंतवणूकदारांनाही रक्कम मिळेल
सात्विकमध्ये शहरातील दोन गुंतवणूकदारांची लाख रुपयांनी फसवणू्क झाली आहेत. मात्र पोलिसांनी १८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यावेळी अमरावतीच्या गुंतवणूकदारांसह नागपूरातीलही काही गुंतवणूकदारांना रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे.
‘मैत्रेय’मध्ये लवकरच पाठवणार पत्र
आम्ही मैत्रयचा तपास सुरू केला आहे. मैत्रेयमध्येसुध्दा संचालकांची मोठ्या प्रमाणात मालमत्ता आम्ही उघड केली आहे. लवकरच तपास पुर्ण करून शासनाकडे पत्र व्यवहार करून सक्षम प्राधिकारी नेमण्यासंदर्भात विनंती करणार आहे. सात्त्विकमध्ये तपास पुर्ण केल्यानंतर शासनाकडे विनंती केली होती, त्यानूसार सक्षम प्राधिकाऱ्यांची नेमणूक केल्याबाबत आम्हाला पत्र प्राप्त झाले आहे. गणेश अणे, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.
बातम्या आणखी आहेत...