आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांची झाली दुर्दशा; अपघाताची शक्यता, पाेलिस आयुक्त देणार साबांवि मनपाला पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिस यंत्रणा सतत प्रयत्नरत आहे, मात्र भुयारी गटार योजना, खासगी कंपणीचे केबली या कामांमुळे शहरातील अनेक मुख्य रस्ते उकरून ठेवले आहे. ते रस्ते महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील आहेत. महिना उलटला तरीही रस्ते व्यवस्थित करण्यात आले नाही, या रस्त्यांवर अपघात हाेऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तातडीने रस्त्यांची सुधारणा करावी असे पत्र महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाला देणार असल्याचे पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी (दि. १३) सांगितले.
अमरावती शहरातील उस्मानिया मस्जीद ते जैन छात्रालय (बस स्टॅन्ड मार्ग) तसेच इर्विन चौक ते उस्मानिया मस्जीद (खापर्डे बगिच्या मार्ग) हे दोन मुख्य रस्ते महाराष्ट्र जीवन प्रााधिकरणाने भुयारी गटार योजनेच्या कामासाठी महीना ते दिड महीन्यापुर्वी रस्त्याच्या अगदी मधोमध उखरले होते. ज्या कामासाठी रस्ते उखडले होते, ते काम पूर्ण झाले आहे. मात्र उकरलेला डांबरी रस्ता पुन्हा डांबरीकरण करून होता त्याप्रमाणे करणे आवश्यक होते. तसे करता त्यावर माती टाकण्यात आली आहे. शहरातील अगदी मुख्य मार्गाची ही अवस्था करून ठेवण्यात आली आहे.
आता पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस आला कि, ही माती मुख्य मार्गावर वाहत येते आणि शहरातल्या मुख्य मार्गाची अवस्था शेताच्या पांदण रस्त्यापेक्षाही वाईट होते. या अवस्थेपेक्षा संपूर्ण रस्त्यावर माती आणि पाण्यामुळे चिखल होतो आणि या चिखलात वाहन घसरून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी या गंभीर बाबीचे रस्ता उकरून ठेवणाऱ्या मजीप्रा किंवा रस्ता दुरूस्त करण्याची जबाबदारी असलेल्या साबांवि महापालिकेला कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते.

मजीप्राने उकरलेल्या रस्त्याची सुधारणा करण्याची जबाबदारी सांबाविची आणि महापालिकेची आहे. यातही मजीप्राने रस्ता सुधारण्यासाठी साबांविला ३० लाख रुपयांच्या आसपास निधी देणे आवश्यक आहे.

दोषींवर थेट गुन्हे दाखल करा
^शहरातील कोणताही मार्ग उखडण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेण्यात आली का? रस्ता कोण उखडत आहे, त्यामुळे वाहतूक विस्कळीत होणार आहे, ही माहिती पोलिसांना देण्यात आली का? माहिती देताच रस्त्यावर काम सुरू आहे काम पूर्ण झाल्यावर त्या मार्गाचे कामसुध्दा योग्य पध्दतीने करण्यात येत नाही. त्यामुळे विनापरवानगीने रस्ते उखडणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करा. दत्तात्रय मंडलीक, पोलिस आयुक्त.