आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यांचा भस्मासुर उठला जीवावर, माती अन् दगड टाकून केली रस्त्यांची डागडुजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या केबलच्या खड्ड्यांचा भस्मासुर दोन दिवसांच्या पावसामुळे अधिक तीव्रतेने शहरवासीयांच्या जीवावर उठला आहे. खोदलेले खड्डे संबंधित यंत्रणेने व्यवस्थित बुजवल्यामुळेच पावसामुळे खड्ड्यातील माती वाहून गेल्यामुळे खड्ड्यांनी उग्र स्वरूप धारण केले आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी भरल्याने त्याच्या खोलीचा अंदाज चुकत असल्यामुळे वाहनचालकांच्या जीवालाच धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, खड्डे बुजवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सुस्त असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मागील अनेक महिन्यांपासून खासगी कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी शहरातील अनेक मुख्य मार्ग खोदून ठेवले. मात्र, काम झाल्यानंतर त्या ठिकाणी थातूरमातूर माती दगड टाकून जबाबदारी झटकली. दरम्यान, शुक्रवारी शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे ही माती पूर्णपणे वाहून उघडे पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. अशा वेळी वाहन खड्ड्यातून घसरून किंवा उसळल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. ही बाब साबांवि तसेच महापालिकेलाही माहीत असूनही सदर खड्डे योग्य पद्धतीने बुजवण्याचे सौजन्य दाखवल्याने गंभीर धोके कायम आहेत.

शहरातील पंचवटी चौक, शेगाव नाका, सीपी कार्यालयासमोर, श्यामनगर, जिल्हा उद्योग कार्यालयासमोर, आरटीओ कार्यालयासमोर तसेच बचत भवनसमोर मुख्य रस्त्यांवरील खड्डे अत्यंत धोकादायक ठरत अाहेत. हे काम करण्यासाठी संबंधित शासकीय विभागाची परवानगी घेऊन उखरलेल्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी वर्ष दीड वर्षांपूर्वीच आवश्यक ती रक्कम त्या विभागांना दिली आहे. तरीही संबंधित विभागाकडून रस्त्यांची डागडुजी झालेली नाही.
पावसाळ्यातडांबरीकरण कठीण : पावसाळासुरू होण्यापूर्वीच रस्त्यांची दुरुस्ती होणे अपेक्षित होते. मात्र,आता पावसाळ्यात डांबरीकरण करणे कठीण असल्याचे साबांविचे म्हणणे आहे.
पंचवटी चौक

रक्कमच मिळाली नाही
बसस्थानक ते उस्मानिया मशीदपर्यंतचा रस्ता मजीप्राने भुयारी गटार योजनेच्या कामासाठी उखरला. काम पूर्ण झाल्यानंतर मजीप्राने त्या ठिकाणी माती टाकली.सदर कामावर डांबर टाकण्याची जबाबदारी आमची असली तरी बाकी काम मजीप्राने करायला पाहिजे होते. डांबरीकरणासाठी मजीप्राकडून अजूनही निधी आला नाही.निधी मिळताच कामाला सुरुवात केली जाईल.
तत्काळ काम सुरू करणार
शहरात केबलिंगच्या कामासाठी खासगी कंपन्यांकडून उखरलेल्या रस्त्यांपैकी आमच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांची संख्या तुलनेते फारच कमी आहे. त्यामध्ये बहुतांश रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील आहे. आमच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांवर उखरण्यात आलेले खड्डे बुजवण्यासाठी आम्ही येत्या काही िदवसांमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेणार आहोत.

Áहेमंत पवार, मनपाआयुुक्त.
धडक कारवाईसाठी ठाणेदारांना परिपत्रक
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत पोलिस आयुक्त मंडलिक गंभीर आहेत. त्यामुळे चार दिवसांपूर्वीच त्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र, अजूनही या खोदकाम केलेल्या मार्गांवर सुधारणा झालेल्या नाही. दरम्यान, आगामी काळात ज्या मार्गांवरील खड्ड्यामुळे अपघात होईल, त्या मार्गावरील कामाची परवानगी देणाऱ्या विभागासह संबंधित कंत्राटदार अन्य दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करण्याबाबत परिपत्रक काढून ते सर्व ठाणेदारांना देण्यात येत आहे.
Áदत्तात्रय मंडलिक, पोलिसआयुक्त.