आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्यापुरात बंदुकीच्या धाकावर लूटले, साईनगरातील गांवडे यांच्या घरी २० मिनीटे थरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर - अज्ञात तीन युवकांनी बंदुकीच्या धाकावर वृद्ध दाम्पत्यास लूटल्याची घटना शहरालगत असलेल्या साईनगर परिसरातमंगळवारी भरदुपारी घडल्याने नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत पसरली आहे. रामराव बाजीराव गावंडे त्यांच्या पत्नीच्या कानाला बंदूक लावून कपाटाची तोडफोड करून काढलेल्या पंधरा ते वीस हजार रोख सोन्याचे दागिने काढून त्यातील केवळ हजार रुपये घेऊन तीन बंदूकधारी तरूण पसार झाले.

साईनगरातील रामराव बाजीराव गावंडे दुपारी चार-साडे चार वाजताच्या सुमारास घरात आराम करीत होते. त्यांच्या पत्नी निर्मला गावंडे या हॉल मध्ये टिव्ही पाहत होत्या. दरम्यान २५ ते ३० वयोगटातील तीन युवक लोखंडी गेटमधून उड्या मारून घरात आले. या युवकांनी गावंडे दाम्पत्याच्या कानाला बंदुक लावून घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले.

दोन चोरट्यांनी घरातील आतिल बेडरूम मधील जुने लाकडी कपाट फोडून त्यातील सुटकेस फोडली. तसेच लगतच्या खोलीतील दोन लोखंडी कपाटही चोरट्यांनी फोडून त्यातील सामान अस्ताव्यस्त केले. दुसऱ्या मजल्यावरील असलेल्या भाडेकरूंच्या घरातही चोरट्यांनी प्रवेश केला होता. चोरट्यांना गावंडे यांच्या घरात १५ ते २० हजार रोख दागिने आढळले. दरम्यान, निर्मला यांनी हे पैसे शेतीच्या चुकाऱ्याचे असल्याचे सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी आम्ही एकच गड्डी नेतो असे म्हणून म्हणत दहा रुपयांच्या नोटांचे एक बंडल घेऊन पळ काढला. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, ठाणेदार नितीन गवारे, प्रवीण तळी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशिरा अमरावती येथील ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले त्यानंतर घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गावंडे दाम्पत्यांचा मुलगा भूषण गावंडे सहाय्यक पोलिस निरिक्षक सून तहसीलदार असून बुलढाणा जिल्ह्यात ग्रामीण भागात कार्यरत आहेत.

चोरटे सराईत गुन्हेगार : घटनेतीलचोरटे हे सराईत गुन्हेगार असून लगतच्या मूर्तिजापूर तालुक्यातील असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. वृद्ध दाम्पत्य हेच घरात राहत असल्याची खातरजमा आरोपींनी आधी केली असून या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना लवकर अटक करण्याचा प्रयत्न करू,असे एसडीपीओ सचिन हिरे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...