आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराचे कुलूप तोडून दागिने लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातीलनवसारी परिसरात असलेल्या एकवीरा विद्युत कॉलनीमध्ये एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाखाचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. एकवीरा विद्युत कॉलनीमध्ये एस. टी. महामंडळामध्ये कार्यरत सुशील जनार्दन डाखोडे (३७) यांचे घर आहे. डाखोडे हे परिवारासह शनिवारी दुपारपासून बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी शनिवारी दुपार ते रविवारी दुपारदरम्यान डाखोडे यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, चपला हार असे दीड लाखाचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.