आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मौजेसाठी कॉलेज तरुणांनी वीज केंद्रात ४ लाख लुटले; ४ तासांत २ लाख खर्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - कॉलेजात शिकणाऱ्या पाच मुलांनी मौजमस्तीसाठी महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रावर दिवसाढवळ्या दरोडा टाकून ४ लाख रुपये लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी घडला. पाचपैकी तीन आरोपी अल्पवयीन आहेत. पोलिसांनी चार तासांतच सर्वांना अटक केली.

प्रवीण प्रभाकर पडोळे (२८) व अंकित चौधरी (२८) हे दोघे नागपुरातील वेगवेगळ्या कॉलेजांत शिकतात, तर उर्वरित तिघे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात आहेत. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास हे पाचही जण रामनगर भागातील वीज बिल भरणा केंद्रात गेले आणि बिल स्वीकारणाऱ्या पीयूष प्रकाश देवगडे (२२) याला हाक मारली. पीयूषने केंद्राचे दार उघडताच त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून ड्राॅवरमधून ४ लाख ३ हजार ८७० रुपये लंपास केले. पोलिसांनी त्वरित कारवाई करून सर्व पाचही आरोपींना अटक केली.

४ तासांत २ लाख खर्च
लुटीनंतर आरोपी बारमध्ये दारू प्यायले. जेवणावरही भरमसाट खर्च केला. अटक झाली तेव्हा आरोपींकडे १ लाख ८४ हजार १६० रुपये सापडले. या चार तासांत आरोपींनी अय्याशीवर जवळपास दोन लाख रुपये उडवले होते.