आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या दीड तासात फोडले दोन फ्लॅट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सर्वसामान्यांच्या मालमत्तेच्या रक्षणाची सर्वसामान्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. असे असले तरी सद्या शहरात चोरट्यांची ज्या पद्धतीने हिंमत वाढली आहे. यावरून चोरट्यांना पोलिसांची तीळमात्रही भिती उरली नाही. कॅम्प परिसरातील विद्याभारती महाविद्यालयासमोरील केशव कॉलनीमध्ये असलेल्या श्रीगणेशा रॉयल रेसिडेन्सीमध्ये मंगळवारी (दि. ६) चोरट्याने सकाळी १०.३० ते १२ वाजताच्या सुमारास अपार्टमेंटमध्ये प्रवेश करून दोन फ्लॅट्स फोडले. यावेळी एका फ्लॅटमध्ये काहीच मिळाले नाही तर दुसऱ्या फ्लॅटमधून जवळपास २५ ते ३० हजारांचा ऐवज लंपास केला .

कविता विजय खल्लारकर या श्रगणेशा रेसिडेन्सीमध्ये फ्लॅट क्रमांक ५०२ मध्ये भाड्याने राहतात. मंगळवारी सकाळी त्या सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. याच दरम्यान त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. यावेळी देवाचे चांदीचे भांडे, सोन्याची अंगठी, कॅमेरा असा जवळपास २५ ते ३० हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. विजय खल्लारकर हे अभियंता असून सद्या ते विदेशात आहेत. दरम्यान १२ वाजताच्या सुमारास खल्लारकर बाहेरून घरी परत आल्या. त्यावेळी त्यांच्या घरी स्वयंपाक करणारी महिला घराजवळ येऊन बसली होती. घराला कडीकोंडा दिसला नाही. त्यामुळे खल्लारकर यांनी घरात जाऊन पाहणी केली असता देवाचे चांदीचे भांडी, अंगठी, कॅमेरा चोरट्याने लंपास केला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच बाहेरच्या दाराला असलेले कुलूप चोरटा सोबत घेऊन गेला.

दरम्यान याच अपार्टमेंटमधील तिसऱ्या माळ्यावर प्रा. अारती घुलक्षे यांचा फ्लॅट क्रमांक ३०४ आहे. या फ्लॅटमध्ये कोणीही राहत नाही तसेच साहित्यसुध्दा नाही. चोरट्याने या फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला मात्र या ठिकाणाहून चोरीला काहीही गेले नाही. चोरी झाल्याची माहिती पुढे येताच खल्लारकर यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. याचवेळी या अपाअर्मेंटच्या चौकीदाराला चौकशीसाठी बाेलवले होते. कारण एक अनोळखी व्यक्ती चोरी झाली त्याच दरम्यान अपार्टमेंट आल्याचे चौकीदाराने पोलिसांना सांगितले होते. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरातील चोरी, घरफोडी, दुचाकी चोरींमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहे मात्र पोलिसांना याचे कोणतेही सोयर सुतक नसल्याचे दिसत आहे. कारण मागील सहा महिन्यात शहर पोलिसांनी एकाही मोठ्या चोरीचा किंवा घरफोडीचा छडा लावला नाही. पोलिस आयुक्त पोलिसींग सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. अनेक बदल, बदल्या, यासोबतच रात्र रात्रभर स्वत: रस्त्यावर उतरून कारवाई केल्या होत्या. मात्र तरीही शहरातील पोलिसांना तपासाचे सूर गवसत नसल्यामुळे चोर शिरजोर झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

पोलिसांचीगस्त चारचाकीतून मुख्य रस्त्याने: चोरी,घरफोडी रोखण्यासाठी पोलिसांचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे शहरातील प्रत्येक भागात प्रभावी गस्त होय. मात्र मागील अनेक महिन्यांपासून शहरात पोलिसांची गस्त मुख्य रस्त्याने तेही चारचाकी वाहनातून सुरू असते. यातही गस्त रात्रीच्यावेळी अधिक प्रभावी राहायला पाहिजे, गल्ली बोळामध्ये किमान एखाद्यावेळी पोलिस दिसायला पाहिजे. मात्र अशी गस्त आता दिसून येत नाही. रात्रीच्या वेळी तर शहरातील केवळ मुख्य मार्गांवरून गस्त केली जाते, ते सुद्धा चारचाकी वाहनातून राहते. वाहनांवर मोठमोठे चमकणारे दिवे असल्यामुळे कसे काय चोरटे मिळतील. कारण नागरी वस्तीमध्ये हे वाहन जाऊन गस्त घालत आहे, हे फारसे पाहायला मिळत नाही.

पालकमंत्र्यांनी आता चोर पकडून द्यावा!
पालकमंत्र्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्च्ून स्वत: वरली अड्ड्यावर धाड टाकली. त्यानंतर सुस्तीत असलेले अख्खे पोलिस प्रशासन खडबडून झोपेतून उठले. त्यानंतर पोलिसांनी अवैध व्यवसायावर धाड सत्र राबवून ते पाच दिवसात बंद केले. सद्या शहरात मोठ्या प्रमाणात चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी सरेआम सुरू आहे. पुन्हा पालकमंत्र्यांनी आता पोलिसांना रंगेहात चोर पकडून देण्याची वेळ आली असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...