आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी सैनिकाच्या घरी धाडसी चोरी, पाच दिवस पूर्ण होऊनही चौकशी नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- माजी सैनिक तथा ज्येष्ठ नागरिक तायडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून दोन संशयितांनी घरातील साहित्याची नासधूस दहा हजार रुपयांची रोख लंपास केली. ही घटना २२ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शहरातील चर्च कम्पाउंड, सिव्हिल लाइन परिसरात घडली. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक असलेले तायडे पाच दिवसांपासून दररोज पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी करण्याची मागणी करीत आहे. परंतु, पोलिस घटनेचे गांभीर्य लक्षात घेत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

याप्रकरणी माजी सैनिक तथा ज्येष्ठ नागरिक याकोबराव विठ्ठलजी तायडे वय ६७ वर्षे रा. चर्च कम्पाउंड यांनी २२ एप्रिल रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार याकोबराव तायडे आपल्या पत्नीसह चर्च कम्पाउंड परिसरात राहतात. २२ रोजी सकाळी माजी सैनिक तायडे त्यांची पत्नी दोघेही घराला कुलूप लावून बाहेर कामानिमित्त गेले होते. दरम्यान, घराला कुलूप असल्याचे पाहून त्यांच्या बाजूला राहत असलेल्या दोन संशयितांनी माजी सैनिक याकोबराव तायडे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. रात्रीच्या सुमारास याकोबराव त्यांच्या पत्नी घरी आल्या. त्या वेळी त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ शहर पोलिस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दाखल केली. पोलिस ठाण्यात उपस्थित कर्मचाऱ्यांनी तक्रार घेऊन कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. परंतु, याकोबराव तायडे पाच दिवसांपासून पोलिस ठाण्यात जात असून दखल घेतली नाही.

गांभीर्यच नाही
शहर पोलिसठाण्यात चोरीप्रकरणी २२ एप्रिलला रीतसर तक्रार दाखल केली. सहा दिवस पूर्ण झाले. परंतु, पोलिसांनी घटनेचे गांभीर्यच लक्षात घेतले नाही. माजी सैनिक तथा ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीचे दखल कुणी घेत नसेल, तर सर्वसामान्यांच काय? असा प्रश्न पडला आहे. याकोबराव तायडे, माजीसैनिक