आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्रसमध्ये कुलूप तोडून चोरट्यांकडून रोख सव्वा लाखांसह दागिने लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्रस- स्थानिक गवळीपुरा प्रभागातील कापड व्यावसायिकांचे बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेली रोख सव्वा ते दीड लाखांची रक्कम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज मंगळवारी पहाटे उघडकीस आली.

भगवानदास हिरानंद मयूर ड्रेसेस या कापड व्यावसायिकांचे गवळीपुरा या दाट वस्ती असलेल्या प्रभागात सहा कुटुंब एकत्रित राहतात एवढे मोठे घर आहे. त्यांच्या मुलीच्या मुलाचे अमरावती येथे मे रोजी सायंकाळी वाजता लग्न असल्यामुळे पूर्ण परिवार अमरावती येथे गेला होता. त्यापैकी एक कुटुंब रात्री वाजता दिग्रसवरून गेले. घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी रात्री ते चे दरम्यान बंद घराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश मिळवला. त्यानंतर प्रत्येक खोल्यांचे कुलूप तोडले. कपाट इतर आलमारी उघडून रोख दागिने चोरून पोबारा केला.
विवाह कार्यक्रम आटोपून मंगळवार, मे रोजी पहाटे वाजता लक्ष्मण टेकचंद छत्तानी हे घरी परतले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत कडीला लटकवलेले दिसले. त्यांनी पोलिस स्टेशन गाठून माहिती दिली. प्राथमिक तक्रारींमध्ये रोख रकमेचा इतर दागिन्यांचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. घरातील सर्व महिला परतल्यानंतर चोरीला गेेलेल्या नेमक्या रकमेचा अंदाज येऊ शकतो, असे सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...