आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत दहा ठिकाणी चोरी, साडेपाच लाखांचा ऐवज लंपास, शहरात चोरटे झाले सक्रिय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- रविवारते सोमवार या दरम्यान तर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दहा चोऱ्या झाल्या असून या दहा ठिकाणांहून चोरट्यांनी लाख ४० हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.
बडनेरा पोलिस ठाण्यात एका पानटपरी मधून ११ हजार २०० रुपयांचा तर महिलेच्या बॅगमधून मोबाईल ९०० रुपये रोख लंपास केली. फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील योगायोग ललीत कॉलनीमधील प्रशांत मनोहरराव राऊत यांच्या घरातून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले. गाडगेनगरच्या हद्दीतून विनय अण्णासाहेब इंगोले यांच्या घरातून दागिने रोख लाख असा लाख ३८ हजारांचा ऐवज लंपास केला.
तसेच जगदंबा माता मंदिरातील हजार ८०० रुपयांचे साहीत्य चोरट्यांनी लंपास केले. श्रीराम नगरमधील सतीश हिम्मतराव देशमुख यांच्या घरातून १६ हजार ६०० रुपयांचा माल लंपास केला. नांदगाव पेठ येथील विवेक रमाकांत जयस्वाल यांच्या ट्रॅक्टरचे रोड वेटर क्रॉस चोरट्यांनी चोरून नेले आहे.बोरगाव धर्माळे शिवारातून एका वाहनाचे दोन टायर चोरट्यांनी लंपास केले. प्रिया टाऊनशिपमधून दिलीप धोटे यांच्या घरातून ६४ हजारांचा ऐवज लंपास केला.