आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता कॉलनीत 3 लाखांची घरफोडी, चोरट्यांना पकडण्‍याचे पोलिसांना आव्‍हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरात यापूर्वी झालेल्या चोरी, घरफोडीच्या घटनेत अजूनही आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. यातच दर आठ दिवसांनी चोरटे शहरात मोठा हात मारून पोलिसांना आव्हान देत आहे. दरम्यान, रविवार ते सोमवारी रात्रीदरम्यान चोरट्यांनी नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील जनता कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका कापूस व्यापाऱ्याच्या घरात चोरी करून 2 लाख ५८ हजारांच्या रोखसह सोन्याचे दागिने असा जवळपास अडीच ते तीन लाखांचा ऐवज लंपास केला.

 

मो. शरीफ मो. शब्बीर (५०, रा. जनता कॉलनी) यांच्या घरात चोरट्यांनी चोरी केली आहे. मो. शरीफ त्यांच्या कुटुंबीयांसह वर्धेला गेले होते. त्यामुळेच रविवारी रात्री संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला. घराचे कुलूप तोडून चोरटे घरात गेले आलमारीमधील लाख ५८ हजारांची रोख, सोन्याचा एक हार, तीन अंगठ्या, एक एलईडी अन्य साहित्य, असा जवळपास अडीच ते तीन लाखांचा ऐवज घेऊन घराच्याच मागील बाजूने उड्या मारून पसार झालेे. सोमवारी सकाळी मो. शरीफ मो. शब्बीर घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ही माहिती नागपुरी गेट पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले.

 

चोरट्यांना पकडण्यात पोलिसांचे प्रयत्न अपुरे : शहरात अनेक मोठ्या चोरी, घरफोडी झाल्याने पोलिस यंत्रणा खडबडूून जागी झाली होती. या प्रकारानंतर पोलिस आयुक्त रात्रगस्तीवर होते. त्यामुळे इतरही पोलिस रस्त्यावर आले. मात्र चोरटे पकडण्यात यश आले नाही.

बातम्या आणखी आहेत...