आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरचे नगरसेवक निलेश कुंभार यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू, प्रथमच पोहोचले होते महापालिकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नगरसेवक निलेश कुंभार यांचा अाज (सोमवारी) स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. प्रथमच नागपूर महापालिकेत पोहोचलेले कुंभार हे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढली होती. 
 
35 वर्षीय निलेश कुंभार होळीपासून आजारी होते. अविवाहित कुंभार दोन दिवसांपूर्वी कोमात गेले आणि आज (सोमवारी) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
 
निलेश कुंभार हे प्रभाग क्रमांक 35 मधून विजयी झाले होते. पाच वर्षांपासून त्यांनी शहरात बांधकाम व्यवसायिक म्हणून नावलौकिक मिळवले होते. त्यांचे वडील निवृत्त बँक कर्मचारी आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले कुंभार हे धडाडीचे तरुण नगरसेवक होते. 
कुंभार यांची अंत्ययात्रा त्यांचे निवासस्थान साईनगर, ओंकारनगर रिंगरोङ येथून निघणार आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...