आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅट्रॉसिटी वादावर चर्चेतून तोडगा काढण्याची तयारी; डॉ. राजेंद्र गवई यांचा नागपुरात संवाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- अॅट्रॉसिटी कायद्याचा मागासवर्गीयांकडून कुठल्याही प्रकारने दुरुपयोग होत नसल्याचा दावा करताना या मुद्यांवर सरकार आणि मराठा नेत्यांशी चर्चेची तयारी असून सामोपचाराने या वादावर तोडगा काढावा, असे मत रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी शनिवारी नागपुरात बोलताना व्यक्त केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत १२ डिसेंबर रोजी मोर्चा नागपुरात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देताना गवई म्हणाले, अॅट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप तथ्याला धरून नाही. याउलट हा कायदा आणखी कडक करण्याची गरज आहे. काही जण या कायद्याचा दुरुपयोग करत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मात्र, अॅट्रॉसिटीच रद्द करा असे म्हणणे चुकीचे आहे. पदोन्नत्यांमधील आरक्षणाचे विधेयक लोकसभेत संमत व्हावे, मराठा-धनगर आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्यात यावे, मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांमध्ये दुप्पट वाढ करावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच बेरोजगारांसाठी योजना आदी मागण्यांसाठी रिपाइंच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार असून त्यात लाख कार्यकर्ते सहभागी होतील, असा दावा डॉ. गवई यांनी केला. दरम्यान, या वेळी गवई गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुन्हा मान्यता मिळवू
इतरपक्षांशी आघाड्या तसेच तळागाळातील कार्यकर्ते दुर्लक्षित राहिल्यानेच डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या या मूळ पक्षाची वाताहत झाली, अशी कबुलीही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना दिली. हा पक्ष पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...