आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RS.tenth Lakh Insurance To ST Bus Passenger Say Divakar Ravate

एसटीच्या प्रवाशांना १० लाखांचे विमा संरक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला १० लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण देण्याचा नवा प्रस्ताव महामंडळाने मंजूर केला आहे. एसटीतील सर्व प्रवासी, चालक व वाहक यांचा प्रवास सुरक्षित करण्याकरिता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अमरावतीत ‘दिव्य मराठी’ला दिली.

एसटीला अपघात झाल्यानंतर जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना एसटीकडून १० हजारांपासून २ लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळते. मात्र, यापुढे मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई दिली जाईल. योजनेसाठी दोन विमा कंपन्यांच्या निविदाही प्राप्त झाल्या आहेत. त्या मंजूर झाल्यानंतर विमा कंपनीशी करार करण्यात येईल.