आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी वस्तूविरुद्ध संघ परिवार मैदानात, ‘चिनी कंपन्या भारत सोडा’ आंदोलन सुरू करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- चीनच्या कुरापतखोर कारवायांना चिनी वस्तूंवर बहिष्काराने उत्तर देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरला आहे. संघ परिवारातील स्वदेशी जागरण मंचाने चिनी वस्तूंच्या विरोधात व्यापक जनजागरणाची आघाडी उघडली आहे. ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबवले जाणार आहे.

स्वदेशी जागरण मंचाचे अखिल भारतीय विचार विभागप्रमुख अजय पत्की यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना ही माहिती दिली. १ ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्र व मुंबईत तर ५ ऑगस्ट ते २० ऑगस्टदरम्यान विदर्भ व मराठवाड्यात चिनी वस्तूंच्या विरोधात घरोघरी जाऊन जनजागरणाचे अभियान राबवले जाईल. त्यात सभा, संमेलन, शाळांना भेटी, युवकांचे मेळावे, मिरवणुका या उपक्रमांचे आयोजन केले जाईल. ९ ऑगस्टला ऑगस्ट क्रांतिदिनी ‘चिनी कंपन्या भारत सोडा’ हे आंदोलन सुरू होणार आहे. चीनच्या कुरापतींना लगाम घालण्यासाठी त्यांच्या मालावर बहिष्कार घालून चीनपुढे आर्थिक संकट निर्माण करणे हा एकमेव उपाय असल्याचे सांगताना पत्की म्हणाले, या व्यापक अभियानाचा निर्णय स्वदेशी जागरण मंचाने मार्चच्या बैठकीत घेतला होता. 
बातम्या आणखी आहेत...