आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Chief Mohan Bhagawat Commented On Vanavesi Development

सरसंघचालक भागवत यांचे मंत्र्यांना चिमटे, वनवासींच्या विकासात अडथळा ठरू नका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेळघाट- राज्यातील जंगलात असलेल्या वनवासींच्या विकासामध्ये काही अडसर येत असेल तर आदिवासी जनता आणि विकासात येणारा अडथळा हटवून ठोस मार्ग काढला पाहिजे, असा सरकारला सल्ला देत रा.स्व. संघांचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंचावर उपस्थित असलेल्या राज्य सरकारच्या मंत्र्यांना शुक्रवारी अमरावती जिल्ह्यात वनवासींच्या विकासात अडथळा होऊ नका, अशा कानपिचक्या दिल्या. या वेळी मंचावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील
उपस्थित होते.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात असलेल्या कोठा या गावी एका कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते. जंगलाचे मालक आदिवासी जनता असल्याचेही सरसंघचालकांनी या वेळी आवर्जून सांगितले. "ब्रिटिशांच्या काळात जंगलाचे मालक आदिवासी म्हणजेच वनवासी जनता होती. मात्र, देश स्वतंत्र झाल्यानंतर जंगलांवर आदिवासींचा हक्क नाही. मेळघाटात संपूर्ण बांबू प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून वनवासींना रोजगार देण्याचा प्रयत्न सुनील देशपांडे आणि निरुपमा देशपांडे यांनी केला आहे. मात्र, मेळघाटात यासाठी पुरेसा बांबू आणि पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहे का? होणार नसेल तर आपण वनवासींना काहीही कमी पडू दिले नाही पाहिजे. त्यांना सोई- सुविधा उपलब्ध करू दिल्या पाहिजेत. यासाठी आपला अडथळा येत असेल तर वनवासींच्या आणि विकासाच्या मधून आपण हटले पाहिजे, असा खोचक सल्ला सरसंघचालकांनी वनमंत्र्यांना दिला.