आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-भाजपने अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून घ्यावे, मा.गो.वैद्य यांचा सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मुंबई महापालिकेचा महापौर हा शिवसेनेचाच असेल, असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी मिळून सत्ता स्थापन करणे जास्त स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. या दोघांनी एकत्रित येऊन अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून घ्यावे, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारक मा.गो. वैद्य यांनी दिला आहे. शिवसेनेचे जास्त नगरसेवक असल्याने, त्यांना महापौरपदाची प्रथम संधी मिळावी, असेही वैद्य यांनी सांगितले आहे.

...तर राज्य सरकार पडेल- वैद्यांचा इशारा
शिवसेना काँग्रेससोबत गेली, तर राज्य सरकारमधूनही बाहेर पडेल. परिणामी या परिस्थितीत राज्य सरकार पडेल, असा इशाराही वैद्य यांनी दिला आहे. सेनेने मुंबईत काँग्रेसची साथ घेतल्यास उत्तर प्रदेशात काँग्रेसचे मुस्लिम मते बाधित होतील, असेही वैद्य यांनी सांगितले. आता संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनीच शिवसेना-भाजपने एकत्रित येऊन सत्ता स्थापन करावी, असा सल्ला दिल्याने, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर महापौर शिवसेनेचा की भाजपचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेकडूनही महापौरपदासाठी मोठी मोर्चेबांधणी सुरु आहे. दुसरीकडे, भाजपच्याही थेट केंद्रातून हलचाली सुरु झाल्या आहेत. ज्या कुणाला काँग्रेससोबत जायचेय, त्यांनी जावे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काढलेल्या विजय रॅलीत शिवसेनेला लगावला होता.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...